चंद्रपूर- मनात असलेली स्वच्छतेची कल्पना विद्यार्थ्यांना आपल्या शब्दात मांडता यावी, शहरात सुरु असलेल्या स्वच्छ चंद्रपूर मोहीमेत विद्यार्थ्यांना योगदान देता यावे यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील ३ केंद्रावर आयोजित करण्यात आलेल्या या निबंध स्पर्धेत सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. "बदलते चंद्रपूर,स्वच्छ चंद्रपूर,सुंदर चंद्रपूर" हा विषय विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. स्पर्धा २ वयोगटात घेण्यात आली.वर्ग १ ते ५ - शब्द मर्यादा १५० शब्द,वर्ग ६ ते १० शब्द मर्यादा २०० शब्द. प्रत्येक शाळेतून ३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. स्पर्धेचा कालावधी १ तासाचा होता व प्रत्येक गटातून विजयी ३ स्पर्धकांना मनपातर्फे बक्षीसे,ट्रॉफी,व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा भावजीभाई चव्हाण हायस्कूल,सावित्रीबाई फुले शाळा,महानगरपालिका सभागृह येथे संपन्न झाली.