- तीन हजारावर नागरीकांनी घेतला
- महाआरोग्य शिबिराचा फायदा
रामटेक तालुका प्रतिनिधी-आमदार रेड्डी साहेबांचे काम अतिषय प्रषंसनिय असून रामटेक विधानसभा क्षेत्राच्या विकासाची त्यांची तगमग प्रषंसनिय आहे.रामटेक व विधानसभा क्षेत्रांतील आरोग्यविशयक समस्यांची आपण नक्कीच दखल घेवू व चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वकाही करू असे आष्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय महाजन यांनी यावेळी दिले.
रामटेक येथे स्थानीक आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या जम्मदिनाचे औचित्यावर षांती मंगल कार्यालयांत भव्य महाषिबीराचे आयोजन करण्यांत आले होते.यावेळी उद्घाटक म्हणून ते आपले विचार व्यक्त करीत होते.या महाषिबीरांत सुमारे तीन हजारावर नागरीकांनी आपली हजेरी लावली व आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
महाआरोग्य षिबीराचे उद्घाटन राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार विजय देषमुख यांचे षुभहस्ते संपन्न झाले.यावेळी राज्याच्या पंचायत राज समीतीचे अध्यक्ष आमदार सुधिर पारवे,आरोग्य षिबीराचे आयोजक आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी,जि.प.नागपुरचे उपाध्यक्ष षरद डोनेकर,माजी उपाध्यक्ष सदानंद निमकर, नगराध्यक्ष दिलीप देषमुख,उपाध्यक्षा कविता मुलमुले,भाजपाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेष्वर ढोक,संजय मुलमुले,राहुल किरपान,लक्ष्मण मेहर आदी मान्यवर हजर होते.
रामटेक तालुक्यांतील नागरीकांनी आरोग्य षिबीरांत मोठी गर्दी केली होती.सर्वच रोगांची तपासणी व उपचार करण्यात येत असल्याने सुमारे तीन हजार नागरीक व महीलांनी याचा लाभ घेतला.आकाषझेप फाउंडेषनच्या वतीने यावेळी रक्तदान कार्यक्रमाचेही आयोजन करण्यांत आले होते.33 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.महाषिबीर यखस्वी करण्यासाठी रामटेक भाजपाचे षहराध्यक्ष आनंद चोपकर,राजेष ठाकरे,संजय बिसमोगरे,रामानंद अडामे,प्रविण मानापुरे,अनिता टेटवार, पद्मा ठेंगरे,लता कामळे,षिल्पा रणदिवे,आलोक मानकर साक्षोधन कडबे,मुलचंद यादव,विषाल कामदार,प्रभाकर खेडकर,स्वप्नील खोडे,करीम मालाधारी,उमेष पटले,उज्वला धमगाये,अनिल कोल्हे,किषोर रहांगडाले,उमेष रणदिवे आदींनी परीश्रम घेतले