সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 16, 2017

बँकानी दुधाळू जनावरांसाठी कर्ज

 
चंद्रपूर : या जिल्ह्यात दूध कमी प्रमाणात होत असल्यामुळे इतर जिल्ह्यातून दुधाचा पुरवठा करण्यात येतो, ही अतिशय चिंताजनक बाब असून या परिस्थितीमध्ये बदल घडून आणण्याकरीता जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी दुधाळू जनावरे खरेदीसाठी बँकेकडे कर्जाची मागणी केली, अशा सर्व नागरिकांना बँकानी कर्ज दिले पाहिजे, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठक दिले.

या बैठकीला महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, अर्चना जिवतोडे, बँकेचे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात जंगल, पाणी, शेती इत्यादी सर्व बाबी उपलब्ध असून सुध्दा दुध मोठ्या प्रमाणात होत नाही. याकरीता दुग्ध विकास विभागांनी पुढाकार घेऊन नागरिकांना गायी व म्हशी पाळण्यासाठी प्रोत्साहीत करावे आणि त्यांना उच्च जातीच्या गायी व म्हशी खरेदी करुन देण्यात द्याव्यात, अशा सूचना संबंधित विभागाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यावेळी दिल्या. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी कुकुटपालन व मत्स्य व्यवसाय वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागांनी नागरिकांशी संवाद साधून त्याना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आसोला मेंढा व अमलनाला प्रकल्पातील मत्स्यबीज केंद्र नादुरुस्त अवस्थेत पडलेले आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येवून मत्स्यव्यवसाय करणाऱ्‍यांना मत्स्यबींज उपलब्ध करुन देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

तसेच चंद्रपूर शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम बरेच दिवसापासून प्रलंबित पडलेले आहे. त्यामधील प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात येवून हा प्रकल्प त्वरीत सुरु करण्यात यावा, असे निर्देश ना.हंसराज अहिर यांनी या बैठकीत महानगरपालिकेला दिले. शहरात मलनिस्सारण यंत्रणा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यात येवून सर्व नागरिकांना पाणी मिळेल यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे, अशा सूचना महानगरपालिकेला त्यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी अर्ज केलेले आहेत. त्या सर्व अर्जाची योग्य पडताळणी करुन सर्वांना योग्य तो न्याय देवून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ कसा देता येईल. या दृष्टीने विचार करण्यात यावा, असेही ना.अहीर यांनी सांगितले. वेंडर ॲक्ट, झरपट व इरई नदीचे सौंदर्यीकरण इत्यादी सर्व विषयावर चर्चा करण्यात येवून ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचनाही महानगरपालिकाला त्यांनी दिल्या.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.