मागील सहा महिन्यापासून संपूर्ण भारतातल्या राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरु केले. दिवसेंदिवस हे आरोप प्रत्यारोप ,वाद , वाढतच गेले त्यामुळे लोकांनासुद्धा या एकमेकांवरील सुरु असलेलेल्या टीकासरणीचा राग आलेला होता. त्यामुळे संपूर्ण जगभरच्या लोकांच्या नजर आता निकालावर लागलेल्या आहे. सध्या सुरु असलेल्या जास्तीत जास्त आरोप प्रत्यारोपाचा दौर हा भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कॉंग्रेस कडून होत आहेत. तर कॉंग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून होत आहेत . कॉंग्रेस भाजपवर टिका करते तर कॉंग्रेस पाठोपाठ इतर पक्षसुद्धा भाजपवर टीकेचे शस्त्र चालवण्यात मागे राहिलेले नाही.रोज यांची बकबक ही एकमेकांविरोधात सुरुच असते. दररोज खमंग अशा बातम्या मिडीयालासुद्धा मिळत गेल्या भाजपनेतर सरळ सोनिया गांधीचे जावई रोबर्ट वाड्रावर चित्रपट प्रकाशित केला. इतर निवडणुकीच्या वेळच्या तुलनेत या लोकसभेच्या निवडणुकीत टिव्ही वरील जाहीराती ह्या खास करून प्रचाराचं आणि आकर्षणाचे माध्यम ठरले. कोणी म्हणतात अच्छे दिन आनेवाले है.., तर कोणी आम्हाला नोकरी लागली ती ... यांच्या धोरणामुळे ...तर कोणी आम्ही रोजगार उपलब्ध करून दिला आमच मत... इतर निवडणुकीच्या तुलनेत या लोकसभा निवडणुकीत सत्ता परिवर्तन होण्याचा योग जुडून आलेला दिसत आहे . मात्र कोणाचे काय होईल कोणास ठाऊक!
ललित लांजेवार, चंद्रपूर
निवडणुकीचा शेवटचा टप्पा जरी बाकी असला तरी सर्वांच्या नजरा आता निकालाची प्रतिक्षेत आहे. लोकसभेसाठी ‘तदान झालेल्या निवडणुकीची मतमोजणी १६ मे रोजी होणार आहे. आणि तेव्हाच लोकांनी देलेला आशिर्वाद हा कोणावर कसा बरसला आणि कोण कोणी कोणावर किती मायेचा हात फिरविला हे माहीत होणार आहे.
उमेदवारांना आता एकमेव प्रतीक्षा आहे ती निवडणूक निकालाची आहे. सत्ता परिवर्तन या शब्दांनी तर जणूकाही संपूर्ण भारतात मोहिनीच घातली होती. प्रचारादरम्यान हे शब्द उन्हाळ्यात भावणाèया आयस्क्रीम सारखे बनले होते. निवडणुकी प्रक्रीया पार पाडल्यानंतर प्रशासन आता मतमोजणीच्या कामाला लागले आहेत सर्वांची उत्कंठा आता शिगेस पोचली आहे. लोकसभा मतदार संघातील लढतीच्या निकालाकडे उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या नजरा लागल्या आहेत.प्रशासन आता मतमोजणीच्या तयारी करण्यात गुंतले आहे. १६ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यांनतर राजकीय हालचालींना वेग प्राप्त होणार आहे. मतदान झाल्यानंतर आता वेगवेगळे अंदाज व्यक्त करण्यात राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते हे रात्रंदिवस गुंतलेले आहेत. त्यामुळे काही उमेदवार आकाशात तर काही जण जमिनीवर तर काही उमेदवारांच्या मनात धाकधुक सुरू आहे. कधी कधी उमेदवार मनात म्हणत असतील की, मेरा दिल क्यु धक धक करणे लगा .... निवडणुक मग ती लोकसभा असो की विधानसभा; या निवडणुकीच्या निकालाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण असतेच. कुठल्या बुथवर किती मतदान झाले, कोणाला किती मते मिळतील तर कोण विजयी होणार याचीच चर्चा आजच्या तारखेत तरी जास्त रंगू लागल्या आहेत.मतमोजणी सुरू असतांना विविध पक्षांचे कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्णय जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी असते. देश भरतील लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान संपुष्टात आले असून कोण जिंकणार, कोण हरणार यावर संशोधन करणे सुरू झाले एकूण सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक निकालाचे व आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोणत्या बड्या नेत्याची पुढची रणनिती काय असणार ते कोणास ठाऊक ! खरोखर काँग्रेससोबत जाणार की, तिसरी आघाडी कि , एनडीएसोबत होईल. चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रात जास्तीत जास्त मोदी नामाचा गजर दिसला होताच . राष्ट्रवादीने लोकसभा निवडणूक संपूर्ण जिद्दीने लढविली होती . सर्व ताकदीने राष्ट्रवादी ग्रुप मैदानात म्हणजेच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. प्रत्येक जागा जिंकण्याच्या हेतुनेच प्रत्येकांनी आपआपली अक्कल लढविली होती १२ मे चा शेवटचा टप्पा आटोपला की , त्यानंतरच कोणाचे भवितव्य किती पाण्यात आहे हे स‘जणार आहे. महाराष्ट्र , मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, असाम ,बिहार या मोठ्या राज्यावर काँग्रेस, भाजपाचे खास करून भवितव्य ठरले आहे.महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक निकालापाठोपाठ विधासभा निवडणुका आलेल्या आहेत. एकूण लोकसभा निवडणूक निकालात काय होते? कोणाच्या तोंडातील घास कोण हिसकतो त्यावर पुढील धोरण ठरून राहणार आहे . परिणामी याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर पडणार आहे . सरकारी कार्यालयात , चहा टपरीवर ,बाजारात , व इतर ठिकाणी व मतदार जो कि राजा असतो या देशाचा या सर्वांना लोकसभा निवडणूक निकालाचे वेध लागले आहेत.
कोण जिंकणार आणि किती फरकाने जिंकणार या चर्चेला १६ मे रोजी थांबा मिळणार आहे . आता निवडणूक निकालाला फक्त ५-६ दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे मतमोजणीची प्रक्रीयेत कोणती बाधा येणार नाही ती सुरळीतपणे पार पडावी. यासाठी ते तयारी सुरु आहे.