कर्जत- दिवा प्रवासी गाडीत बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्याने रोहा-दिवा गाडी रोहा येथे थांबविण्यात आला. तपासानंतर मात्र, ही अफवा असल्याची माहिती सूत्रांकडून कळते.
रोहा दिवा प्रवासी ही गाडी पहाटे रोहाला येत असताना रोहा पोलिसांना फोन आला. गाडीमध्ये हर्षदा म्हात्रे नावाची महिला असून तिच्याजवळ असलेल्या पिशवीत बॉम्ब आहे, असे सांगण्यात आले होते. बॉम्बच्या फोनने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली होती. त्यावेळी अलिबागहून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले, एक पीएसआय, त्यांचे चार कर्मचारी आणि ङ्कलेलोङ्क नावाचा डॉग घटनास्थळी दाखल झाले. गाडी रिकामी करण्यात आली आणि चार तासाच्या अथक प्रयत्नाने काहीच न सापडल्याने ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाच तासानंतर गाडी सोडण्यात आली.