सावली - किसाननगर येथील जमीनीचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या श्रमिक एल्गारच्या कार्यकत्र्यांसह 38 शेतक-यांना सावली पोलीसांनी अटक केली.
सावली तालुक्यातील किसाननगार येथे राजपूत भामटा समाजाचे कुटुंबासोबत इतर जातीचे 20 कुटुंब मागील 30-40 वर्शापासुन राहत आहेत. इतर जातीचे 4 कुटुंब भुमिहीन असल्यामुळे अनेक वर्शापासुन सरकारी जमीनीवर अतीक्रमण करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. पिक घेऊन उदरनिर्वाह करीत असतांना भामटा समाजाच्या काही लोकांनी त्यांचे पाळे उध्वस्त केले व जिवे मारण्याची धमकी दिली. या शेतक-यांचे हजारोचे नुकसान झाल्यामुळे पोलीस स्टेषन सावली येथे अनेकदा तक्रार दाखल केली.परंतु पोलीसांनी कमजोर समाजाच्या लोकांना संरक्षण न देता मुजोरी करणाÚया लोकांवर काहीच कारवाई केली नाही. मात्र सदर प्रकरण उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडे पाठविले. तहसिलदार सावली यांनीही या प्रकरणात दुर्लक्ष केले. किसाननगर येथील लोक गुन्हेगारी प्रवृतीचे असल्यामुळे षेतावर जाण्यार इतर जातीचे लोक घाबरत होते. श्रमिक एल्गारच्या नेतृत्वार इतर जातीचे लोकांनी जमीनीचा ताबा घेण्यासाठी षेतावर गेले. या ठिकाणी दोन गटात वाद होऊ नये म्हणुन पोलीसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. या ठिकाणी तहसिलदार वंदना सवरंगपाते, ठाणेदार तांगडे, पाथरीचे ठाणेदार रिजवी, नायब तहसिलदार चन्नावार उपस्थित होते. तहसिलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांचे मनाई हुकुम असतांना ताबा घेण्यासाठी आल्यामुळे अटक करण्याचे सांगीतले. यावरून पोलीसांनी श्रमिक एल्गारचे महासचिव विजय कोरेवार, अनिल मडावी, भास्कर आभारे, केवळराम राऊत, केषव राऊत, षालीक मंगर, बाळकृश्ण उरकुडे, पुश्पा नेवारे, छाया सिडाम, किरण षेंडे,सपना कामडी, विकास उईके इत्यादी 38 लोकांवर भादवी कलम188,448 मुपोका 135 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.
प्रशासन मुजोर
भामटा लोकांनी जबरदस्तीने मराठी लोकांचे षेती उध्वस्त करून मारण्याची घमकी दिली असतांना याबाबत पोलीसात व तहसिलदारकडे तक्रार दाखल करूनही मुजोर लोकांवर काहीच कारवाई न करता आपला उदरनिवाही मजुरी करून चालविणाÚयांवर अटकेची कारवाई केली आहे.
प्रशासन मुजोर
भामटा लोकांनी जबरदस्तीने मराठी लोकांचे षेती उध्वस्त करून मारण्याची घमकी दिली असतांना याबाबत पोलीसात व तहसिलदारकडे तक्रार दाखल करूनही मुजोर लोकांवर काहीच कारवाई न करता आपला उदरनिवाही मजुरी करून चालविणाÚयांवर अटकेची कारवाई केली आहे.