जळगांव घरकुल घोटाळा - एकनाथराव खडसे
श्री. खडसे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई दि. 9 :- संपूर्ण राज्यात तसेच देश पातळीवर गाजलेल्याजळगांवच्या तत्कालीन नगर पालिकेतील घरकुल घोटाळयातीलआरोपींना वाचविण्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव येत आहे, त्यामुळे हाखटला प्रभावीपणे चालविणाऱ्या सरकारी अभियोक्त्यांच्या नियुक्त्याशासनाने तडकाफडकी व कोणतेही कारण न देता रद्द केल्या आहेत.

शासनाच्या अशा अतार्किक कृतीमुळे या खटल्यातील प्रमुख आरोपीआमदार व माजी मंत्री सुरेश जैन व इतर आरोपींना जामीन मिळू शकतो,त्यामुळे सदर खटला कमकुवत करण्याचे प्रयत्न राजकीय हितसंबंधापोटीकेले जात असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसेयांनी म्हटले आहे. यासंदर्भात श्री.खडसे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणयांना पत्र लिहून सदर खटल्यातील आरोपींना जामीन मिळू नये म्हणूनसरकारी अभियोक्त्यांनी केलेली विशेष प्रयत्नांची पराकाष्ठा विचारात घेताआता अशा महत्वाच्या टप्प्यावर सरकारी अभियोक्ते बदलू नयेत अशीमागणी केली आहे.