সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 16, 2014

विजयाची हॅट्रीक

 लोकसभा मतदार संघात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विक्रमी मते घेवून विजयाची हॅट्रीक साधत राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा २ लाख ३६ हजार २६९ मतांनी दारूण पराभव केला.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी आघाडी घेतली होती. अंतिम फेरीपर्यंत ती सातत्याने कायम राहिली. मतदार संघातील एकूण १७ लाख ५२ हजार ६१५ मतदारांपैकी ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीत हंसराज अहीर यांना पाच लाख ८ हजार ४९ एवढी मते पडली तर काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८0 मते घेतली. पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते व आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार ४१३ एवढय़ा मतांवरच समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हंसराज कुंभारे हे ४९ हजार २२९ एवढी मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. १८ उमेदवार रिंगणात होते. वरील तीन प्रमुख उमेदवार वगळता १५ उमेदवारांची डिपाझीट जप्त झाली. यात बसपाचे हंसराज कुंभारे यांच्यासह अशोक खंडाळे (रिपाइं), कुरेशी म. इखलाख म. युसूफ, रोशन घायवन (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), नितीन वसंतराव पोहाणे, नंदकिशोर गंगाराम रंगारी, पंकजकुमार शर्मा (तृणमुल काँग्रेस), फिरोज उस्मान खान पठाण, सिध्दार्थ रमेशचंद्र राऊत, अतुल अशोक मुनगीनवार, कार्तीक गजानन कोडापे, नामदेव माणिकराव शेडमाके, प्रमोद मंगरुजी सोरते, विनोद दिनानाथ मेश्राम, संजय निलकंठ गावंडे यांचा समावेश आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.