সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 27, 2014

चंद्रपूर जिल्ह्यात वार्षिक योजनांसाठी 97 टक्के खर्च

- पालकमंत्री संजय देवतळे

चंद्रपूर : जिल्हा वार्षिक योजना 2013-14 च्या खर्चास आज जिल्हा नियोजन समितीने मंजूरी प्रदान केली. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, ओटीएसपी व अनुसूचित जाती उपयोजना या चारही योजना मिळवून मार्च 2014 अखेर 97 टक्के खर्च झाला. पावसाळ्यापूर्वी गावपातळीवर ग्राम पंचायततर्फे नाल्यांची त्वरीत सफाई करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, आमदार शोभाताई फडणवीस, नाना शामकुळे, अतुल देशकर, विजय वडेट्टीवार, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

सन 2013-14 या वर्षात सर्वसाधारण योजना 135 कोटी 99 लाख 50 हजार, आदिवासी उपयोजना 83 कोटी 27 लाख, ओटीएसपी 33 कोटी 39 लाख 84 हजार व अनुसूचित जाती उपयोजना 46 कोटी 23 लाख 62 हजार असा एकूण 298 कोटी 89 लाख 96 हजार खर्च झाला. खर्चाची टक्केवारी 97.37 टक्के एवढी आहे. या खर्चास अध्यक्ष व समिती सदस्यांनी मंजूरी प्रदान केली.

जिल्हा वार्षिक योजना 2014-15 चा नियोजन आराखडा मंजूर झाला असून प्रस्तावित कामांचे प्रस्ताव तयार करुन संबंधीत विभागाने तातडीने मान्यता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. चालू आर्थिक वर्षात कोणत्याही विभागाचा निधी शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचे सर्व विभाग प्रमुखांनी नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत जिल्ह्यात जिल्हा परिषेदेतर्फे सन 2014-15 चा मागासक्षेत्र अनुदान निधीचा प्रारुप आराखडयाबाबत चर्चा करुन केंद्र पुरस्कृत या योजनेचा ग्राम पंचायतीनी विविध विकास कामासाठी ठराव करुन विकास कामे करावी, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.

जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीच डेंगू व मलेरिया सारख्या आजाराने थैमान घातले आहे. त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागाने नियोजन करुन त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच ज्या भागात पाणी येवून विद्युत पुरवठा बंद होत असेल त्या ठिकाणची डिपी दुसऱ्या ठिकाणी लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव तयार करुन त्वरित सादर करावे असेही संबंधित विभागाला पालकमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीत आमदार व अशासकीय सदस्यांनी आपआपल्या भागातील समस्या मांडल्या. बैठकीचे संचालन जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे यांनी केले. तर चिमूरचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.