সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 11, 2014

नक्षल हल्ल्यात ७ जवान शहिद


गडचिरोली - गडचिरोलीच्या चामोर्शी येथे नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडोच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ जवान शहिद तर दोन जवान जखमी झाले आहेत. सुनील मादवी, रोहन दंबाडे, सुभाष कुमरे, दुर्योधन नाकतोडे, तिरुपती आलम, लक्ष्मण मुंडे (सुमो चालक) अशी या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं आहेत. 

नुकतीच प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना नवी दिल्लीहून अटक करुन गडचिरोलीला आणण्यात आले आहे. त्यानंतरच या परिसरात हा स्फोट झाला आहे. त्यामुळे साईबाबांच्या अटकेच्या निषेधार्थ हा स्फोट नक्षलवाद्यांनी घडवून आणल्याची चर्चा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामुर्शी तालुक्यातील पवीमुरांडा गावाजवळ माओवाद्यांनी भुसुरुंगाच्या साहाय्याने पोलिसांची सुमो गाडी उडविली. नक्षल भागातून गस्त घालून दोन सुमो गाड्यांतून परतत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांची एक सुमो गाडी उडविली. घटनास्थळी पोलिस पथक दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 
महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 पथकामधील हे सर्व जवान होते. नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या साहाय्याने जीप उडविल्यानंतर गोळीबारही केला. नक्षलवाद्यांच्या या गोळीबाराला जवानांनी प्रत्युत्तर दिले. सुमारे अर्धा तास गोळीबार सुरू होता. त्यानंतर नक्षलवादी जंगलात पळून जाण्यात यशस्वी झाले.
Maoists attack in Maharashtra’s 
Gadchiroli district kills seven cops
Seven policemen were on Sunday killed and two others injured when Maoists carried out a landmine blast in Maharashtra's Gadchiroli district. 
The incident occurred at 9:40am when the policemen were moving for an operational task in the forest between Pavimuranda and Murmuri villages in Chamorshi taluka of the district. 
Officials said the slain security personnel belong to the specialized C-60 anti-Naxal operations force of Maharashtra and the blast took place when their vehicle was moving along the Murmuri-Chamuri axis of the district. 
"We have lost seven of our men in the attack carried out by Naxalites. The incident occurred in Gadchiroli," a senior police officer said.  The injured have been airlifted to Nagpur while additional reinforcements of security personnel have been sent, they said.  After the landmine blast, there was an exchange of fire between the police and Maoists.  Firing is still going on in the forest area, police said.

पोलिस चकमकीत सहा महिला नक्षलवादी ठार
गडचिरोली - पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये आज (ता. 7) सकाळी एटापल्ली तालुक्‍यातील मेंढरी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहा महिला नक्षलवादी ठार झाले, तर पाच जखमी झाल्याचा अंदाज आहे
रविवार, 7 जुलै 2013

सहांचे मृतदेह सापडले गोविंदगाव जंगलातील कारवाई गडचिरोली- नक्षलविरोधी अभियान पथकाच्या जवानांनी गोविंदगाव जंगल परिसरात केलेल्या कारवाईत दहा नक्षलवादी ठार
सोमवार, 21 जानेवारी 2013

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.