स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्या ११ मेपासून लागणार असल्याचे सुधारित आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी काढलेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षकांना १0मेपर्यंत शाळा करावी लागणार आहे.
सुधारीत पत्रकानुसार उन्हाळी सुट्या १२ ते २५ जूनपर्यंत राहणार असून २६ जूनपासून शाळा सुरू होणार आहे. एकूण ३८ दिवस उन्हाळी सुट्या राहणार आहे. दिवाळी सुट्या दहा दिवस (२0 ऑक्टो. ते ४ नोव्हें.पर्यंत) असून ५ नोव्हेंबरला शाळा सुरू होईल. १७ एप्रिलला येथे शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात सर्व शिक्षक संघटनाच्या पदाधिकार्याची सभा घेण्यात आली. त्यात उन्हाळी सुट्याचे सुधारित नियोजन करण्यात आले.
संपूर्ण राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान सर्वोच्च राहत असताना शाळा १0मेपर्यंत चालवणे ही बाब अन्यायकारण असल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. इतर विभागाप्रमाणे १ मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर केल्या असत्या, तर शिक्षकांना दिलासा मिळाला असता, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.