शिक्षकांच्या बदल्यांचा विषय वादाचा ठरतो. यंदा बदल्यांची प्रक्रिया येत्या 17 मेपासून सुरू होणार आहे. त्यात दहा टक्के प्रशासकीय आणि दहा टक्के विनंती अशा 20 टक्के सर्वसाधारण बदल्या होणार आहेत.
जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जारी केले असून, जिल्हास्तरीय बदल्यांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी सर्व बदल्या समुपदेशनाने करण्याच्या सूचना आहेत. जिल्हास्तरीय प्रत्यक्ष बदली प्रक्रिया 17 मे ते 23 मे आणि तालुकस्तरीय बदल्या 26 ते 31 मेपर्यंत पार पडणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार लवकरच सर्व संवर्गाच्या प्रशासकीय बदल्यांच्या सेवाज्येष्ठता याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.