दुर्गापूर उपक्षेत्रीय वेकोलि भांडार परिसरात लागलेल्या भीषण आगीने कोट्यवधींचे नुकसान झाले. तब्बल १० बंब ही आग विझविण्यासाठी कामी लागले होते. आगीचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही.
दुर्गापूर खुल्या कोळसा खाण परिसरात असलेल्या क्षेत्रीय भंडाराला रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये जवळपास ५0 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
दुर्गापूर कोळसा खाण परिसरात चंद्रपूर वेकोलिचे क्षेत्रीय भंडार आहे. या भंडारातून चंद्रपूर क्षेत्रात असलेल्या सर्व कोळसा खाणींना लागणारे साहित्य पुरविले जाते. कोळसा खाणीत कोळसा व माती उत्खननाकरिता मोठमोठय़ा वाहनांचा उपयोग केला जातो. या वाहनांचे जुने टायरसुद्धा येथे साठविण्यात येतात. त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणात भंगार साहित्य आहे. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास येथे साठवून ठेवलेल्या टायरला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने उग्ररुप धारण केल्याने परिसरात सर्व साहित्य आगीने क्षणात आपल्या कवेत घेतले. याच परिसरात मोठय़ा संख्येने ऑईलने भरलेले ड्रम तसेच काही अंतरावर वेकोलिचे क्षेत्रीय भंडारचे कार्यालयही आहे. या आगीमध्ये टायर, भंगारातील चार चाकी वाहने जळून खाक झाली. आगीची माहिती अधिकार्यांना देण्यात आली. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.