সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 11, 2014

मनसेची विधान सभा तयारी

चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूक न लढावीणा-या मनसेने विधानसभा तयारी सुरु केली आहे. आता कामाला लागायला हवे असे आवाहन मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी केले.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपुष्टात आल्यानंतर आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. राज्यात भाजपने सोशल मीडियाद्वारे विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही तयारी सुरू केली. विदर्भात बैठकांवर जोर देऊन राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मनसेने दिले.
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत गडकरी यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा तीन दिवसांचा दौरा केला. बल्लारशाह मतदारसंघातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले. या मतदारसंघातील पोंभूर्णा येथे मेळाव्यात अनेक तरुणांनी मनसेत प्रवेश केला. त्यानंतर चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, वरोरा, भद्रावतीसह चंद्रपूर शहरात कार्यकर्त्यांना जनतेशी संवाद वाढवून समस्या सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले. चंद्रपूर जिल्ह्यानंतर गडकरी यांनी गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातही कार्यकर्त्यांना बैठकीचा दिवस निश्‍चित करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत.




गोंडपिपरी येथील गजानन महाराज काॅलेज आॅफ सायन्स च्या सभागृहात नुकताच कार्यकत्र्याचा मेळावा घेण्यात आला.यावेळी कार्यकत्र्याना मार्गदर्षन करतांना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दिलीप रामेडवार हे तर पं्रमुख अतिथी म्हणून राहूल बालमवार,मनदीप रोडे,राम धोटे,सागर वडपल्लीवार,राजु गलगट, राकेश पुन, राकेश नगारे, कैलास नगारे,अली उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.