সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 07, 2014

शेतकऱ्यांना मदतमिळण्यासंदर्भात जोरदार मागणी

गारपीटग्रस्तांना मदतीसंदर्भातउच्च न्यायालयात
दिलेले आश्वासनस रकारने पाळले नाही - - एकनाथराव खडसे

मुंबई, दि. 7 :- राज्यात फेब्रुवारी व मार्च, 2014 या दोनमहिन्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे विदर्भ,खानदेश, मराठवाडा व कोकणात शेतकऱ्यांच्या पिकांचेअतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तांतडीनेमदत मिळावी म्हणून उच्च न्यायालयात जनहित याचिकाहीदाखल झालेली आहे. या याचिकेवर 28 मार्च रोजी निर्णय देतांनाशेतकऱ्यांना दि. 5 ते 16 एप्रिल दरम्यान नुकसान भरपाईचीरक्कम अदा करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यशासनाने उच्चन्यायालयास दिली होती. परंतु एप्रिल महिना उलटूनगेल्यानंतरही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदतमिळालेली नाही. 
जळगांवसह अनेक जिल्ह्यात तर अद्यापहीनुकसानीचे पंचनामेसुध्दा पूर्ण झालेले नाहीत. सरकारने यानुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दयावी अशी मागणीविधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनीमुख्यमंत्र्यांकडे केली. श्री.खडसे व जामनेरचे आमदार गिरीषमहाजन यांनी आज विधान भवनात मुख्यमंत्री पृथ्वीराजचव्हाण यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी श्री.खडसे व आ.महाजन यांनी शेतकऱ्यांना मदतमिळण्यासंदर्भात जोरदार मागणी लावून धरली.
राज्य शासनाने उच्च न्यायालयास दिलेल्याआश्वासनाप्रमाणे कार्यवाही झालेली नसल्यामुळे जर येत्या आठदिवसात शेतकऱ्यांना मदतीचे वाटप झाले नाही तर आम्हीशासनाच्या विरुध्द अवमान याचिका दाखल करणार आहोतअसा इशारा श्री.खडसे व आ.महाजन यांनी यावेळी दिला. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाविनाविलंब मदत देण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात यावेत,अशी विनंतीही श्री.खडसे यांनी केली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.