সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 08, 2014

महत्वाचे

तीन आरोपींना अटक

देवाडा (खुर्द): पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास धनगे यांना मारहाण करणार्‍या तीन आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.


विद्युत शॉकने इसमाचा मृत्यू

वरोरा : येथून ५ किमी अंतरावर असलेल्या शेंबळ येथे मोटर सुरू करण्यासाठी गेलेल्या इसमाला शॉक लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. रमेश मारोती बोरकर (३४) असे मृतकाचे नाव आहे. तो ग्रामपंचायतमध्ये चपराशी पदावर कार्यरत होता.

वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू
वरोरा : तालुक्यातील खांबाडा बसस्थानकासमोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने युवकाला धडक दिल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. राजकुमार बाळकृष्ण भोयर (२५) रा. वाघसावली असे मृतकाचे नाव आहे.

स्टोव्हच्या भडकेने महिला जळाली
वरोरा : येथील रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असणार्‍या पर्बत यांच्या घरी स्टोव्हच्या भडकेमुळे महिला गंभीररित्या जळाली. सविता संजय पर्बत (२५) असे महिलेचे नाव आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.