महिलांच्या प्रयत्नांना यश
ब्रम्हपुरी - तालुक्यातील पाचगांव येथील दोन बियर बार बंद करण्याचा ठराव महिला ग्रामसभेत एकमताने पारीत झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार दुकानांना सिल ठोकुन बंद करण्यात आले.ब्रम्हपुरी तालुक्यातील पाचगांव छोटयाशा गावात प्रथमेश व विनायका हे दोन बियर बार आरमोरी येथील दिलीप जेठमल मोटवानी व प्रशांत मनोहर मोटवानी यांचे मालकीची होती. या बारमुळे गावातील अनेक संसार दध्वस्त झाले, अनेक युवक दारूच्या व्यसनी लागले, महीलांच्या छेडखानीचे प्रकार वाढले, ब्रम्हपुरी ते गडचिरोली हा महामार्ग असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असे असतांनाही मोटवानी यांनी नविन देशी दारू दुकान सुरू करण्याकरीता हालचाली सुरू केल्या. काही महीण्यापुर्वी महीलांनीच ग्रामसभेत नविन देशी दारू दुकानास परवानगी नाकारली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारूमुक्ती अभियानाचे माध्यमातुन दोन्ही दारू दुकान बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क यांचेकडे केली. या मागणीकरीता श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी व येथील सरपंच अरूण तिवाडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला त्यानुसार त्यानुसार संवर्ग विकास अधिकारी सानप यांचे अध्यक्षतेखाली 17 मे 2014 ला ग्रामपंचायतीचे आवारात महीला ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत एकुण 145 महिला मतदारापैकी 104 महिलांनी 145 विरूध्द शुन्य मतांनी दारूबंदीचे बाजुन कौल दिला. यामुळे एकमताने दारूबंदीचा ठराव पारीत केला. ठराव पारीत झाल्यानंतरही महिला थांबल्या नाही व जिल्हाधिकारी यांना आदेश भेटुन आदेश काढण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी आदेश काढुन प्रथमेश व विनायका या दोन्ही बारला सिल ठोकले.