गोंडपिपरी तालुक्याच्या सिमेवरून वाहणार्या वर्धा नदीच्या पात्रात एका मच्छीमार जाळे टाकत असतानाच फिट आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बाल्या चिन्ना बाकेवार (३५) रा. लगामबोरी ता. अहेरी, असे मृत मच्छीमाराचे नाव आहे.
बाल्या बाकेवार हा १0 ते १२ वर्षांपासून मासेमारीचा व्यवसाय करतो. तो वर्षातील केवळ ४ महिने गावात काढत असून, उर्वरित ८ महिने नदीपात्रातच राहत होता. शुक्रवारी रात्री मासे पकडण्यासाठी बाल्या नदीपात्रात जाळे पसरवीत होता. दरम्यान त्याला पाण्यात फिट आल्याने तो पाण्यात कोसळला व यातच त्याचा मृत्यू झाला. मृताकडे शेती नसल्याने या व्यवसायावरच त्याची उपजिविका होती. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व चार भाऊआहेत. बाल्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुबीयांवर मोठे संकट कोसळले असून, शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.