उन्हाळ्याच्या सुट्यात बाहेरगावी फिरायला जाणार्या नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. ऐनवेळी प्रवासी प्लॅनिंग केल्यामुळे त्यांच्या हातात वेटिंगचे तिकीट पडत असून नाईलाजास्तव त्यांना आपला प्रवासाचा बेत रद्द करण्याची पाळी येत आहे. नागपुरातून चारही दिशांना जाणार्या रेल्वेगाड्यांमधील बर्थचा आढावा घेतला असता सर्वच गाड्यात वेटिंगची स्थिती आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यात नागपूरमार्गे चारही दिशांना जाणार्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. मुंबईकडील गाड्यात विदर्भ एक्स्प्रेसचा एसी फस्र्ट क्लास ३ जूनपर्यंत, एसी सेकंड १७ जूनपर्यंत, एसी थर्ड २३ जूनपर्यंत आणि स्लिपरक्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. दुरांतोत एसी फस्र्ट १९ मेपर्यंत, एसी सेकंड २७ मेपर्यंत, एसी थर्ड २८ मेपर्यंत आणि स्लिपरक्लास २९ मेपर्यंत फुल्ल आहे. सेवाग्राम एक्स्प्रेसचा एसी फस्र्ट ३ जूनपर्यंत, एसी सेकंड ४ जूनपर्यंत आणि स्लिपरक्लास २९ मेपर्यंंत वेटिंग आहे. पुण्याकडील गाड्यात नागपूर-पुणे एक्स्प्रेस एसी फस्र्ट, सेकंड आणि स्लिपरक्लास १६ जूनपर्यंत फुल्ल आहे. नागपूर-पुणे गरीबरथही १६ जूनपर्यंंत फुल्ल आहे. अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्येही १६ मेपर्यंंत वेटिंग आहे. नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे सर्व कोच १0 जूनपर्यंंत फुल्ल आहेत. नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेसही जून महिन्यापर्यंंत हाऊसफुल्ल आहे. नागपूर-इंदूर एक्स्प्रेसमध्येही तीच स्थिती आहे. दिल्लीकडील गाड्यात जीटी एक्स्प्रेसमध्ये जुलैपर्यंंत 'नो रूम' आहे. तामिळनाडूतही 'नॉट अँव्हेलेबल' आहे. दक्षिण एक्स्प्रेसही २७ जूनपर्यंंत फुल्ल असून, चेन्नईकडील तामिळनाडू एक्स्प्रेस १७ जूनपर्यंंत वेटिंगवर आहे.