कोट्यवधींची मालमत्ता |
जालना- लघुपाटबंधारे विभागाच्या इंजिनिअर्सच्या घरात कोट्यवधींची मालमत्ता सापडली आहे.या विभागाचे अभियंते रघुवीर यादव, भास्कर जाधव, श्रीनिवास काळे, रामेश्वर कोर्डे यांना अटक करण्यात आली आहे. या अभियंत्यांच्या औरंगाबादेतल्या घरांची झडती घेण्यात आली तेव्हा रामेश्वर कोरडेंच्या 3 फ्लॅटसमध्ये 14 तोळे सोनं, भास्कर जाधवांकडे 6 किलो सोनं, 2 कोटी रोकड सापडली आहे तर श्रीनिवास काळेंकडे 2.50 लाख रोकड, 4 चांदीचे लॉकर, 70 लाखांची संपत्ती आणि रघुवीर यादव यांच्या घरात 1 किलो 7 ग्रॅम सोनं सापडलं आहे.
या अधिकार्यांच्या विरोधात खासदार रावसाहेब दानवे यांनी 2011 मध्ये पाझर तलावाच्या कामात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांच्यावर 13 लाख 61 हजारांच्या अपहाराचा आरोप त्यांनी या तक्रारीत केली होता.
मालमत्ता
भास्कर जाधव, निवृत्त इंजिनीअर
- 6 किलो सोने
- दोन घरं
- 5 लाख रोख,
रघुवीर यादव, निवृत्त इंजिनीअर
- 1 किलो सोनं
- 1 घर
- 3 लाख रोख, लॉकर झडती सुरू
: श्रीनिवास काळे, निवृत्त इंजिनीअर
- साडे चार किलो चांदी
- 4 लाख रोख
- औरंगाबादेत अंदाजे 70 लाख रुपयांचं घर
रामेश्वर कोरडे, निवृत्त इंजिनीअर
- औरंगाबादेत 3 घरं
- अंदाजे किंमत 1 कोटी रु.
- 14 तोळे सोनं