नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घोषित केलेल्या परीक्षा वेळापत्रकात पुन्हा एकदा सुधारणा केली आहे. त्यानुसार ८ मे रोजी होणारे काही पेपर आता विविध तारखांना होणार आहेत. ८ मे रोजी एमएचसीईटी ही परीक्षा होणार असल्याचे कारण विद्यापीठाने दिले आहे.
तथापि, सुधारित वेळापत्रकात बी.ए, बी.कॉम, बीएससी, बीसीए, एम.ए भाग दोन इकॉनॉमिक्स, एलएलबी, एम.ए. भाग-१ (इंग्रजी, मराठी), एम.ए. पहिले सत्र, हिंदी, उर्दू, इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, वुमन्स स्टडी, अरेबिक, संस्कृत, आंबेडकर विचारधारा, पाली, गांधी विचारधारा, होम सायन्स, बुद्धिस्ट स्टडी, मानसशास्त्र, पर्यटन आदी परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.