সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 13, 2014

जिल्हय़ात २१५ बोगस डॉक्टरांची नोंद

बोगस डॉक्टरांकडे जाणार्‍या रुग्णांची मोठय़ा प्रमाणात लूट करण्यात येत असल्याची चर्चा डॉक्टरांकडून उपचार घेणार्‍या रुग्णांमध्ये सुरू आहे. सोबत काही बोगस डॉक्टर एलआयसी एजंट आहेत. त्यामुळे त्यांनी दवाखाण्याच्या समोर एलआयसीचा बोर्ड लाऊन थेट दवाखानाच थाटला आहे. सध्या जिल्हय़ात २१५ बोगस डॉक्टर असल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाच्या दप्तरात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष घालून बोगस डॉक्टरांवर पायबंद घालण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. 

सुशील नगराळे / चंद्रपूर
  • बोगस डॉक्टरांची आकडेवारी
  • तालुका संख्या
  • चंद्रपूर 0५
  • बल्लारपूर 00
  • भद्रावती २५
  • वरोरा १0
  • मूल 0८
  • सावली २२
  • सिंदेवाही 0४
  • नागभीड १५
  • ब्रम्हपूरी ११
  • गोंडपिपरी २६
  • पोंभूर्णा 0४
  • कोरपना १६
  • राजुरा २0
जिल्हय़ात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तर अनेक गावात उपकेंद्र आहेत. मात्र ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रात अनियमित औषध पुरवठा, कर्मचार्‍यांची कमतरता व अत्याधुनिक सुविधा आणि वैद्यकीय अधिकार्‍यांची रिक्त पदे यामुळे शासकीय रुग्णसेवा पूर्णत: ढासळली आहे. याच संधीचा फायदा घेत जिल्हय़ात बोगस डॉक्टरांची संख्या वाढली आहे. मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र नसतानाही जिल्हय़ातील ग्रामीण भागात सर्रासपणे बोगस डॉक्टरांनी रुग्णालय थाटले आहेत.
ग्रामीण जनतेला तातडीने आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीकोनातून तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय तर तालुक्यातील लोकसंख्येने मोठय़ा असलेल्या गावांत आरोग्य उपकेंद्राची स्थापना करण्यात आली. प्रशासनाने ज्या उद्देशाने येथे शासकीय रुग्णसेवा सुरू केली. त्याच उद्देशाला दुसरीकडे प्रशासनच हरताळ फासत असल्याचे चित्र येथील शासकीय रुग्णसेवेकडे नजर टाकल्यास स्पष्ट होते. ग्रामीण रुग्णालयात औषधांचा तुटवडा ही नित्याचीच बाब झाली आहे. सोबतच अपुरा कर्मचारी पुरवठा व अत्याधुनिक सोयीसुविधा नाही. हीच स्थिती प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. बर्‍याच उपकेंद्रातील परिचारीकाही वेळेवर हजर राहत नाही. त्यामुळे त्या परिसरातील रुग्णांची मोठय़ा प्रमाणात हेळसांड सुरू होते. परिणामत: ग्रामीण भागातील रुग्णांना खिशाला अधिकची कात्री लावत खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.
दरम्यान याच संधीचा फायदा घेऊन वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना केवळ मोठय़ा शहरामध्ये चार ते पाच वर्ष परिचर म्हणून काम केल्याच्या अनुभवाखाली बहुतांश नागरिकांनी स्वत:चे रुग्णालय थाटले आहे. सर्दी, खोकला, ताप या आजारांवर उपचार करून सर्रास नागरिकांची लूट केली जात आहे. गंभीर रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यास रुग्णांची थातुरमातुर तपासणी करून त्यांना दुसर्‍या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला किंवा इतर ठिकाणाहून तज्ज्ञ डॉक्टर बोलावले जात असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. तसे झाल्यास संबंधित रुग्णांकडूनच अधिकचा खर्च वसूल केला जात आहे.
जिल्हय़ातील चिमूर, पोंभर्णा, चंद्रपूर, कोरपना, जिवती, राजुर अन्य तालुक्य़ातील गावखेड्यात फेरफटका मारल्यास संबंधित डॉक्टरांकडे उपचार घेतलेल्या नागरिकांच्या मुखातून ही चर्चा ऐकायला मिळत आहे. ल्ल

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.