সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, May 10, 2014

सव्वापाच वर्षांत ४४ वाघ ठार

देशात वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्रात मागील सव्वा पाच वर्षात ४४ वाघांचा मृत्यू विविध कारणांनी झाला असून त्यातील २५ टक्के वाघ हे शिकारीचे बळी ठरल्याचे समोर आले आहे.
पंकज मोहरीर, चंद्रपूर
२०१० च्या व्याघ्रगणनेनुसार देशात १७०६ वाघ आहेत. त्यात राज्यातील वाघांची संख्या १६९ आहे. या व्याघ्रगणनेत राज्याने १०३ वरून १६९ वर व्याघ्रभरारी घेतली होती. मात्र उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार २००९ पासून आतापर्यंत म्हणजे सव्वा पाच वर्षात राज्यात विविध कारणांनी ४४ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक, नऊ वाघांचा मृत्यू अपघाताने तर ११ वाघांचा मृत्यू हा शिकारीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात २०१२ मध्ये तीन तर २०१३ मध्ये चार वाघांचे मृत्यू हे शिकारीने झाले होते. वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जात असताना देखील राज्यातील शिकारीचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. त्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज प्रतिपादीत होऊ लागलेली आहे. राज्यातील वाघांच्या संख्येत मोठी वाढ असल्यानेच शिकाऱ्यांची नजर राज्याकडे वळली आहे. अपघाताने मृत्युमुखी पडलेल्या वाघांची संख्याही मोठी आहे.

* चालू वर्षात एकच शिकार

देशात सव्वा चार महिन्यात २३ वाघ मृत्युमुखी पडले आहेत. तर राज्यात एका वाघाचा मृत्यू झाला आहे. चालू वर्षात वाघाचे सर्वाधिक बळी तामिळनाडू राज्यात गेले आहेत. तेथील संख्या सहा आहे. दरम्यान चालू वर्षात शिकारीवर आळा घालण्याच्या दृष्टीने वनविभाग तुर्त यशस्वी झाला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.