नवेगाव पर्यटकांसाठी सात गाईड्सची व्यवस्था
नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग-६ वरील कोहमारा गावाकरुन अवघ्या तीन किमी अंतरावरील नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचे बकी/कासबी गेट पर्यटकांसाठी १ मेपासून खुले करण्यात आले आहे.
बकी गेट हे गोंदिया, भंडारा व रायपूर या परिसरातून येणार्या पर्यटकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प अंतर्गत ग्राम परिस्थितीकी विकास समिती कोलारगाव/कोसंबी यांच्या संयुक्त विद्यमाने बकी गेट १ मेपासून सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगलवारी करताना बादेराई, आगेझरी, रानीडोह, तेलझरी, जांभूळझरी, महादेव पहाडी, कवाडगुता, रांजीटोक, झेंडा पहाड असे अनेक ठिकाण पर्यटकांना पहण्यासाठी मिळणार आहेत. हे सर्व ठिकाण दाखविण्यासाठी सात गाईडची सुविधा करण्यात आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ज्या ठिकाणी वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय आहे, अशा ठिकाणी वन्य प्राणी प्रामुख्याने आढळतात. या ठिकाणाला एक वेगळे नाव देऊन पर्यटकांचे लक्ष केंद्रित केल्या जात आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात प्रामुख्याने नीलगाय, चितळ, हरिण, अस्वल, तेंदुवा, रानगवा, ससा, मांजर, वाघ, मोर, सांबर, बिबट, रानकुत्रे, रानडुक्कर असे अनेक वन्य पशू-पक्षी मोठय़ा प्रमाणात पाहावयास मिळतात.
बकी गेटपासून चार किमी अंतरावर जंगलातील झनकारगोंदी तलावाजवळ दिवसभर वन्य प्राणी येताना दिसतात. हा तलाव जास्त मोठा नसल्यामुळे आलेल्या पर्यटकांना जवळून प्राण्यांचे दर्शन नेहमीच होते. दूरवरुन आलेल्या पर्यटकांनी झनकारगोंदी तलावावर अवश्य जायला पाहिजे. गोंदिया, रायपूर, नागपूर, भंडारा, तिरोडा, साकोली मार्गे आलेल्या पर्यटकांना कोहमारावरुन बकी गेटमार्गे वन भ्रमण केल्यास व्याघ्र प्रकल्पातील चांगले ठिकाण पाहावयास मिळतील. बकी गेटवरुन पुढे रांजीटोक हा नवेगावबांधचा सहा किमीचा किनारा पाहावयास मिळतो. या सहा किमी परिसरात बाहेरुन आलेल्या विदेशी पक्ष्याचे दर्शन मोठय़ा प्रमाणात होते. नवेगावबांध राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाच्या बकी गेटपासून १५२ किमी अंतर वनभ्रमण केला जातो. टी.के. गाईड या राष्ट्रीय वनातील मध्य ठिकाणी पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. या ठिकाणी पर्यटकांना झुला व निसर्ग गवताची कुटी तयार केली आहे. त्या ठिकाणी १ मे रोजी लहान मुलांनी चांगलीच मौज-मजा-मस्ती केली. वन्य प्राणी पाहण्यासाठी फारच उंच लोखंडी टॉवर तयार केला आहे. या टॉवरवरुन पाहिल्यास संपूर्ण घनदाट जंगलाचे रहस्य उलगडल्यासारखे वाटते. त्याचबरोबर वन्य प्राणी पाहता येतात.नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पातील झेंडा पहाड हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ७२४ मीटर उंच आहे. झेंडा पहाडसुद्धा पर्यटकांना पाहता येतो. वनभ्रमण करताना पर्यटकांनी चौकस नजर ठेवणे गरजेचे आहे. कोणता प्राणी कोणत्या मार्गे पळत सुटेल, हे सांगता येत नाही.
नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाचे रितसर उद््घाटन प्रधान सचिव महसूल व वन विभाग मुंबईचे प्रवीण परदेशी व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मिश्रा यांच्या हस्ते ३१ जानेवारी २0१४ रोजी करण्यात आले. पण वनातील अंतर्गत रस्ते वाहणे चालविण्यासाठी योग्य नसल्यामुळे १ मेचे औचित्य साधून बकी गेट सुरु करण्यात आले