विनोद तावडे यांची शासनाकडे मागणी
गडचिरोली : गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सात जवान शहीद झालेली घटना महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची आता उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी रविवारी केली. तावडे यांनी हा नक्षलवादी हल्ला म्हणजे गृह खात्याचे अपयश असल्याची जोरदार टीका केली. नक्षलवादी हल्ले रोखण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना आखल्या पाहिजेत. या परिसरात कर्तव्य बजावणार्यांना सर्व अत्याधुनिक शस्त्र सामुग्री दिली गेली पाहिजेत. या घटनेमध्ये आम्हाला राजकारण आणायचे नाही परंतु त्या भागातील पोलिसांना आत्याधुनिक शस्त्र सामुग्री पुरविणे हे सरकारचे कर्तव्य आहे,पण यामध्ये सरकारमधील राजकीय नेते कमी पडले का यांचा विचार त्यांनी केला पाहिजे असेही तावडे यांनी म्हटले आहे.
माओवाद्यांचा थिंक टँक मानल्या जाणार्या प्रा. जी. एन. साईबाबा याला शुक्रवारी गडचिरोली पोलिसांनी दिल्लीत अटक केली हे पोलिसांचे उत्तम यश मानले पाहिजे असे सांगताना ते म्हणाले की, जेव्हा साईबाबा ला अटक केली त्यानंतर नक्षलवाद्यांकडून याचा निषेध म्हणून प्रतुत्तर दिले जाईल अशी शक्यता गृह विभागाच्या गुप्तचर यंत्रणांना असायला हवी होती पण गुप्तचर यंत्रणा मात्र यामध्ये कमी पडली. हल्ल्यात शहीद झालेल्या शहीद जवानाच्या कुटुंबियाची जबाबदारी सरकारने घेतील पाहिजे. तसेच नुकसान भरपाई देताना नियमाच्या कचाट्यात न अडकविता तत्काळ द्यावी, अशी मागणी तावडे यांनी केली आहे.