সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, May 09, 2014

रस्त्यासाठी डोनीवासीयांची पदयात्रा

DSCN2249.JPG प्रदर्शित करत आहे
 - श्रमिक एल्गारचे नेतृत्व
चंद्रपूर तालुक्यातील घनदाट जंगलातील आदीवासी वस्तीचे डोंनी या गावात जाण्यासाठी रस्ता तयार होत असतांना वनविभागाने अडविल्यामुळे शेकडो गावकरी डोनी ते चंद्रपूर पदयात्रा करून मागणीकडे लक्ष वेधले.
चंद्रपूर तालुक्यात शेवटच्या टोकावर जंगलात डोनी हे आदीवासी वस्तीचे गांव असुन वनविभागाचे बफर क्षेत्रात आहे. या गावात जाण्यासाठी जानाळा पासुन 12 कि.मी. अंतर हा खडीकरणाचा रस्ता आहे. खडीकरण होऊन बरेच वर्ष झाल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीस पुर्णपणे
नादुरूस्त आहे. या गावात जाण्यासाठी एस.टी. महामंडळाची बस सकाळी व सायंकाळी जाते परंतु रस्ता खराब असल्यामुळे अनेकदा बस जातच नाही. आपल्या सोयीसाठी हा एकमेव रस्ता असल्यामुळे अनेकदा गावकÚयांनी श्रमदान करून रस्ता दुरूस्त केलेला आहे. गावकÚयांच्या अनेकदा केलेल्या मागणीनुसार
जि.प. मार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आले व रस्ता 700 मिटर करण्यात आला त्यानंतर वनविभागाने या रस्त्याचे काम अडविले. गावात आदीवासंींना रोजगार नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, स्वच्छ पाणी नाही परंतु होणारा रस्ताही अडविल्याने गावकरी संतप्त झाले व श्रमिक एल्गारच्या संस्थापिका
अॅड. पारोमिता गोस्वामी यांचे नेतृत्वात डोनी ते बफर वनविभाग चंद्रपूर अशी 53 कि.मी. पदयात्रा शेकडो महीला- पुरूषानी काढली. यावेळी उपवनसंरक्षक नरवडे यांनी मागणीचे निवेदन स्विकारले व जि.प. बांधकाम विभागातुन फाईल मागवुन रस्ता सुरू करण्याची तात्काळ मंजुरी दिली. या पदयात्रेत श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार, विजय कोरेवार, शहनाज बेग, पप्पुभाऊ देशमुख, सुलेमान बेग, अनिल मडावी, छाया सिडाम, गजानन सिडाम, चंद्रशेखर , संगिता गेडाम, प्रविण चिचघरे, पे्रमदास उईके किरण
शेंडे, घनश्याम मेश्राम, फरजाना शेख, विकास उईके,यमराज बोदलकर, सपना कामडी आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.