हंसराज अहिर
जन्म ११ नोव्हेंबर, १९५४
नांदेड, महाराष्ट्र
कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मतदारसंघ - चंद्रपूर
राजकीय पक्ष - भारतीय जनता पक्ष
पत्नी - लता हंसराज अहिर
अपत्ये - २ मुलगे
निवास - चंद्रपूर, महाराष्ट्र
चंद्रपूरचे भाजपचे खासदार हंसराज अहिर. केंद्र सरकारच्या कोळसा घोटाळ्यामुळे चर्चेत आले. अहिरांनी तब्बल तीन वेळा चंद्रपूरचं संसदेत प्रतिनिधित्व केलं.
भाजपचा ओबीसी चेहरा म्हणजे चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर.
संसदेत 100 टक्के उपस्थितीचा पुरस्कार अहिरांनी पटकवला.
* उपलब्ध निधी – 19 कोटी रुपये
* मंजूर निधी – 15 कोटी रुपये
* खर्च केलेला निधी – 12 कोटी रुपये
* खासदार निधीचा एकूण वापर – 85 %
सभागृहात विचारलेली प्रश्नसंख्या
* स्वतंत्रपणे: 26
* संयुक्तपणे: 23
* एकूण: ४९
कोळशाच्या खाणी काहींसाठी सोन्याच्या खाणी ठरल्या. पण चंद्रपूरच्या लोकांच्या आरोग्याचा मात्र कोळसा झाला. इथल्या औष्णिक विद्युत केंद्रांनी राज्यभर वीज पुरवली. पण इथल्या जंगलातल्या आदिवासीच्या जगण्यातला काळाकुट्ट अंधार मात्र तसाच राहिला. आदिवासींना वन हक्क देणारा ऐतिहासिक कायदा झाला. पण इथल्या आदिवासींना ना वन हक्काच्या जमिनी मिळाल्या, ना खाणींमध्ये जमिनी गेलेल्यांचं पुनर्वसन झालं. चंद्रपूर हे सरसंघचालक मोहन भागवत यांचं जन्मगाव. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगट्टीवार यांचाही मतदारसंघ. त्यामुळे अहिरांची कारकीर्द ही भाजपसह संघासाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.
मतदारसंघ : चंद्रपूर
मतदान दिनांक : १० एप्रिल
एकूण मतदान : ६५.१०टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – संजय देवतळे
महायुती – हंसराज अहीर (भाजप)
अपक्ष – वामनराव सुधैशैरा
बसपा - हंसराज कुंभारे
आरपीआय - अशोक खंडाले
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
हंसराज अहिर – भाजप – ३,०१,४६७ मतं - ३३.५५%
नरेश पुगलिया – काँग्रेस - २,६८,९७२ मतं - २९.९४ %
वामन चटप - स्वतंत्र भारत पक्ष – ५७,५१९ मतं - ६.४०%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,३६,३५२
पुरुष : ७,९६,१५६
महिला : १५,३६,३५२
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
कोळसा घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी भाजपचे खासदार हंसराज अहिर यांनी सरकारशी पत्रव्यवहार केला होता. हा घोटाळा उघडकीस येताच अहिर यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला.
अहिर हे पुन्हा लढणार असले तरी त्यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही, असा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
चंद्रपूरमधील काँग्रेस ही विभागलेली आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांचा लागोपाठ दोनदा पराभव झाला. त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती.
सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्याकडे लोकसभेचे उमेदवार म्हणून बघितले जात होतं. देवतळे यांच्या समाजाची मते मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर आहेत.
काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही सारे काही आलबेल नाही. माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यातून विस्तव जात नाही.
मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
अत्यल्प सिंचन सोयी, राज्याच्या राजधानीशी जोडणारी सरळ रेल्वे गाडी नाही.
शेकडो खनिज प्रकल्प मात्र खनिज विकास निधी अपुरा.
हे क्षेत्र देशातील प्रदुषणाच्या नकाशावर पहिल्या तीन शहरांमध्ये
बेसुमार जंगलतोड
वन्य प्राण्याच्या हल्ल्यानंतर मिळणारी नुकसान भरपाई अत्यल्प
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी बफर क्षेत्र घोषित केल्याने ८० गावांचा विकास रखडला
वणी-आर्णी या क्षेत्रात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न
शासनाने जाहीर करूनही सामुहिक व वैयक्तिक वनहक्क पट्टे देण्याची प्रक्रिया रखडली.
जातीपातीची समीकरणं
तेली-माळी-कुणबी प्राबल्याचे क्षेत्र, आदिवासींची निर्णायक मते, अडीच लाख बौद्ध, 70 हजार मुस्लिम, 10 लाख मराठी भाषिक, एक लाख हिंदी भाषिक, तेलुगु 1.25 लाख