সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 11, 2014

डॉक्टरांना बाहेरचा रस्ता !

अनैतिक मार्गाने पैसा कमावणा-या मेडिकल असोसिएशनचा इशारा
नागपूर- स्वत:च्या लाभासाठी रुग्णांचा गैरफायदा घेऊन त्यांना नको त्या वैद्यकीय चाचण्या करायला भाग पाडणाèया आणि लुबाडणाèया डॉक्टरांना संघटनेतून काढून बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. तेव्हा यापुढे कुठल्याही तज्ज्ञाने अशा अनैतिक मार्गाचा वापर करुन नये, असा विनंतीवजा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे. डॉक्टरी पेशा हे सेवा क्षेत्र आहे. यामुळे रुग्णांचा डॉक्टरांवर विश्वास असणे गरजेचे आहे. नव्हे विश्वास हा उपचारातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विश्वास नसेल तर उपचार सकारात्मक परिणाम करीत नसतात. त्यामुळे आम्हाला तो रुग्ण आणि डॉक्टरांमधील विश्वास कायम ठेवायचा आहे. काही डॉक्टर रुग्णांचा गैरफायदा घेत असतील तर त्यांनाही इशारा द्यायचा आहे. व्यवसाय सर्वांनी करावा पण सचोटीने आणि प्रामाणिकणे हीच आमची प्रांजळ भूमिका असल्याचे डॉ. संजय देशपांडे यांनी सांगितले.

भारत-थायलंडच्या समानतेचा शोध घेणार त्रिभाषा कोश !
 वर्धा-  भारत आणि थायलंड मधील समान धाग्यांना जोडण्याकरता दोन्ही देशांतील संस्कृती, शिक्षण आणि धार्मिक पर्यटन यांची सांगोपांग चर्चा करणारा त्रिभाषा कोश तयार करण्यात आला आहे. मूळच्या थायलंडच्या असलेल्या वृत्थिफोड थविनसमबत यांनी भारतात आल्यानंतर दोन्ही देशांतील समान गोष्टींचा शोध घेऊन त्यावर अभ्यास केला आणि हा कोश तयार केला आहे.
 महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय qहदी विद्यापीठात ‘एमए qहदी अनुवाद प्राद्योगिकङ्क विषयावर वुत्थिफोड अभ्यास करीत आहे. यापूर्वी बँकॉक येथील सिप्लाकॉर्न विश्वविद्यालयातून थाई भाषेत पदवी मिळवली आहे. या विद्यार्थिनीने शोध निर्देशक डॉ. अन्नपूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली थाई-qहदी-इंग्रजी पर्यटन कोश तयार केला आहे. या कोशात जवळपास ५०० शब्दांचा वापर करण्यात आला असून qहदी-थायी आणि इंग्रजी शब्द आहेत. भारताच्या दृष्टीने बुद्धगया, सारनाथ, हिमालयाच्या रांगा,  गंगा नदी हे ठिकाण पर्यटनाला वाव देणारे आहेत. येथे थायलंडचे पर्यटक सतत येत असतात. थायलंडही भारतीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. अशा सर्व पर्यटन केंद्रांची माहिती या कोषातून देण्यात आली आहे. केवळ पर्यटनच नव्हे तर या शोधातून सांस्कृतिक बाबीही मांडण्यात आल्या आहेत. त्याला सांस्कृतिक पर्यटन असे संबोधण्यात आले आहे. भारतात दिवाळी आणि संक्रात हे उत्सव साजरे केले जातात. याप्रमाणेच थायलंडमध्ये दिवाळीला ‘लॉय-क्र-थाडङ्क आणि संक्रांतीला ‘सोंक्रांतङ्क हे सण साजरे केले जातात. लॉय-क्र-थाड हा उत्सव कार्तिक पौर्णिलेला साजरा करतात. हा त्यांचा बारावा महिना असतो. या सणाला केळीच्या पानांपासून qकवा कागदापासून छत्री बनवतात. त्यात दिवा वा मेणबत्ती लावून नदी qकवा तलावात सोडतात. थायलंडमध्ये qहदी भाषा बरीच रुजली आहे. येथे महिन्यातून एकदा qहदी चित्रपट प्रदर्शित होते. याला लोकांची मोठी गर्दीही असते.


प्रस्तावित सावकारविरोधी कायद्याला विरोध!
अकोला - सावकारविरोधी कायद्यातील कलम १८ मधील कालमर्यादा ३० वर्षे वाढविण्यात यावी, अशी मागणी सावकारग्रस्त शेतकरी समितीने राज्याच्या सहकार आयुक्त व निबंधकांकडे केली आहे. दुसरीकडे, येत्या पावसाळी अधिवेशनात या कायद्यात बदल न केल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा शेतकèयांनी दिला असून ‘करो या मरोङ्कच्या मानसिकतेने शेतकरी आले आहेत. अल्पशा मोबदल्यात उदरनिर्वाहाची साधन असलेली सोन्यासारखी जमीन हडपून शेतकèयांना देशोधडीला लावत आत्महत्यांस प्रवृत्त करणाèया सावकारविरोधी कायद्याला आता प्रखर विरोध होत आहे. हा कायदा शेतकèयांना नव्हे तर सावकारांना अभय देणारा असल्याचे आरोप होत असून, यामध्ये शासनाने घुसवलेल्या कालमर्यादेच्या अटीने हा कायदा ‘दात पडलेल्या वाघासारखाङ्क झाला आहे.




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.