সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 11, 2014

जगातील सर्वाधिक प्रदूषित ५०० शहरांत चंद्रपुर

दिल्ली सर्वाधिक प्रदूषित नाहीच, असे केंद्र सरकारच्या अखत्यारितील वायू गुणवत्ता हवामान अंदाज आणि संशोधन संस्था (सफर) या संस्थेने सांगत जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल नाकारला. नागपूरच्या प्रदूषणाबाबत पर्यावरणतज्ज्ञांचे अहवालाविरोधात मत गेले. पण चंद्रपूरच्या प्रदूषणाबाबत तज्ज्ञ, जाणकारांसोबत पर्यावरणवादीही अहवालाच्या बाजूने असल्याचे समोर आले आहे. चंद्रपुरात प्रदूषणाची मात्रा जास्तच असल्याचे मान्य केले आहे.
पंकज मोहरीर, चंद्रपूर
जागतिक आरोग्य संघटनेने ९१ देशातील १६०० शहरांचा अभ्यास केला. त्यात चंद्रपूरच्या हवेत २.५ मायक्रोमीटरपेक्षा कमी व्यासाच्या सुक्ष्म कणांचे (पीएम २.५) प्रमाण ७६ असल्याचे आढळून आले आहे. हा अहवाल २०१० ते २०१३ या कालावधीतील माहितीवर आधारित आहे. त्यांची केवळ पाच माहिती केंद्रे असल्याने त्या अहवालाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. पण, चंद्रपूरच्या बाबतीत हा अहवाल योग्य वाटतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. चंद्रपुरातील प्रदूषणाचा अभ्यास नीरी व आयआयटी पवई करीत असून त्यांच्या तज्ज्ञांनीही चंद्रपुरात धुलीकणांचे प्रदूषण मोठे असल्याचा दावा केला आहे. ते कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आपल्या अहवालातून या संस्था सुचविणार आहेत. प्रदूषणाबाबत सुचविलेल्या उपाययोजना राबविण्यास प्रारंभ झाल्यावर ताबडतोब बदल दिसणार नसल्याचे त‌ज्ज्ञांचे मत आहे. मात्र भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसतील, असा दुजोराही त्यांनी दिला आहे.

आज देशात गुजरात येथील अंकलेश्वर हे प्रथम, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद हे द्वितीय, गुजरात येथील तापी तृतीय तर चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत चतुर्थ स्थानावर आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी गाझियाबाद व तापी येथील प्रदूषणाचा गुणांक कमी झाला. ही दोन्ही शहरे सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीतून बाहेर पडले. मात्र या दोन्ही शहरातील गुणांक वाढल्यावर ते पुन्हा यादीत समाविष्ट झाले. चंद्रपूर तूर्त चतुर्थ स्थानावर दिसून येत आहे. आरोग्यतज्ज्ञांनी तर हे शहर भविष्यात राहण्यालायकीचे राहणार नसल्याची भीती व्यक्त केली आहे. चंद्रपूरचा प्रदूषण गुणांक ८३.८८ आहे. हे गुणांक ७५च्या वर नको, असे शास्त्र सांगते.

अंकलेश्वर येथे धुलीकणांसोबत वातावरणातील रसायन, गाझियाबाद येथे वाहतूक व उद्योग तर तापी व चंद्रपुरात धुळकण व वाहतूक प्रदूषण मोठे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चंद्रपूरच्या प्रदूषित भागात चंद्रपूर उद्योग भाग, घुग्घुस, बल्लारपूर, एमआयडीसी ताडालीचा समावेश होतो.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.