সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, May 01, 2014

स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकावला

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. आज महाराष्ट्र दिनाचे औचीत्य साधून विदर्भ वाद्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करीत स्वतंत्र विदर्भ राज्याचा झेंडा फडकावला.

वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भ कनेक्ट अर्थात 'व्ही कॅन'ने सुरू केलेल्या लढ्यात महाराष्ट्र दिनी सर्व अकराही जिल्ह्यात विदर्भाचा झेंडा फडकवण्यात आला. खोटी आश्वासने देऊन राज्यकर्त्यांनी त्यांचे राजकीय हेतू साध्य केले. वैदर्भीयांच्या भावनांचा विचार न करता महाराष्ट्रात समावेश करण्यात आले. मात्र, विकास होणे तर दूर उलट अन्यायच झाला. वेगळ्या राज्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी विदर्भ कनेक्ट ही संघटना स्थापन करण्यात आली. या माध्यमातून आज सकाळी ९ वाजता सर्व जिल्हा मुख्यालयात व्ही कॅनच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आले.

वेगळ्या राज्याविना विदर्भाचा आर्थिक, सामाजिक विकास शक्य नाही. आर्थिकदृष्ट्या विदर्भ सक्षम होणार नाही, असे कारण नेहमीच समोर करण्यात येते. त्याला प्रत्युत्तर म्हणून वैदर्भीय साधन संपन्नता दर्शवणारा पंचरंगी झेंडा तयार करण्यात आला असल्याचे व्ही कॅनचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी सांगितले.

उच्च दर्जाच्या संत्री उत्पादक प्रदेशाचे प्रतीक म्हणजे केशरी रंग. राज्याच्या एकूण उत्पादनात ६२ टक्के वाटा असलेल्या कापसाचा पांढरा रंग. राज्यातील ६२ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी तब्बल ६० वनसंपदेची श्रीमंती दाखवणारा हिरवा रंग. विपूल खनिजाचा खजान्यासाठी निळा रंग. एकट्या विदर्भात ७ हजार २०० मेगावॅट विजेपैकी गरज फक्त २० टक्के आणि उर्वरित विजेपासून संपूर्ण राज्याला उर्जा, ही दर्शवणारे विजेचे चिन्ह, कोळशाच्या गर्भश्रीमंतीसाठी कोळसा आणि दुर्मिळ होत चाललेल्या वाघांची व्याघ्रभूमी म्हणून पट्टेदार वाघाचे कातडे नकाशात दर्शवण्यात आले आहेत.

नागपुरात बजाजनगर चौकातील विष्णुजी की रसोई येथे सकाळी ९ वाजता ध्वजारोहण झाले. यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात आली.



শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.