एकनाथराव खडसे यांची केंद्रीय ग्रामविकासमंत्र्यांकडे मागणी
नवी दिल्ली, दि. 27 :- नरेगा योजनेत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. यायोजनेचा ग्रामीण भागातील जनतेला प्रत्यक्ष फायदा व्हावा म्हणून नरेगाचा पुनर्विचारकरुन नव्याने आखणी करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचेज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडेकेली.

श्री.मुंडे यांनी आज नवी दिल्ली येथील कृषी भवनात केंद्रीय ग्रामीण विकास,पंचायत राज व सांडपाणी व्यवस्था मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी श्री.खडसेयांच्यासह केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, रावेरच्या नवनिर्वाचितखासदार रक्षा खडसे व धुळयाचे नवनिर्वाचित खासदार डॉ.सुभाष भामरे उपस्थित होते.त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान श्री.खडसे यांनी श्री.मुंडे यांच्याकडे ही मागणी केली.
नरेगाच्या माध्यमातून शेत तिथे रस्ता ही योजना राबवून रस्ते तयार करता येऊशकतील काय, शेतातील मजूर हा उत्पादक कामात गुंतलेला असल्याने त्याला रोजगारहमी योजनेतून पगार देता येईल काय अशा बाबींचा ग्रामीण विकास मंत्रालयाने विचारकरुन योजनेत आवश्यक तो बदल करण्याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे शेतकऱ्यावरीलभार कमी होण्यास मदत होईल. यापूर्वीच्या केंद्रातील कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेस सरकारच्यादुर्लक्षामुळे नरेगाच्या कामासाठी आलेला पैसा महाराष्ट्रातून परत गेला. पंतप्रधान नरेंद्रमोदींच्या नेतृत्वाखालील सरकार अवर्षण प्रवण कार्यक्रम, राष्ट्रीय जमीन सुधारणाकार्यक्रम, ग्रामीण जिवीका अभियान यासारख्या योजनांची महाराष्ट्रात प्रभावीपणे वसक्षमपणे अंमलबजावणी करेल व त्यातुन राज्यातील जनतेला फायदा होईल अशीअपेक्षा श्री.खडसे यांनी यावेळी व्यक्त केली.