সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, May 05, 2014

‘ओव्हरबर्डनचे काम २५ मे पूर्वी पूर्ण करा’

गेल्या वर्षी चंद्रपूरला अतिवृष्टीचा तडाखा बसला. अर्धे अधिक शहर पाण्याखाली आले. त्याच्या संभाव्य कारणांचा शोध घेण्यात आला. यात ओव्हरबर्डन हे एक कारण समोर आले आहे. ही समस्या सोडविण्याची सूचना नीरीने दिली आहे. त्यावर कामही सुरू झाले आहे. हे सर्व काम येत्या २५ मेपूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

वेकोलिच्या ओव्हरबर्डनमुळे नदीच्या पाण्याच्या प्रवाहास अडथळा, पात्र अरुंद, गाळ नदीमध्ये वाहत येऊन पात्र उथळ होणे, पावसाळ्यात कृत्रिम पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होवून आजूबाजूच्या गावांना धोका, परिसरातील शेतीचे नुकसान, वेस्टर्न कोल फिल्डतर्फे अवैधपणे नाले वळविणे, खाणपट्टा करारनाम्याच्या अटी व शर्तीचा भंग याबाबत अलीकडेच पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. नीरीचे डॉ. राजेश बिनिवाले यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ओव्हरबर्डनची पाहणी केली. पद्मापूर, लालपेठ, माना टेकडी, सास्ती कॉलरी, वर्धा नदी व घुग्गुस येथील ओव्हरबर्डनची पाहणी या दौऱ्यात करण्यात आली. ओव्हरबर्डनमुळे उद्भवणाऱ्या समस्यांसंदर्भात वेकोलिने उपाययोजना आखण्याच्या सूचना डॉ. राजेश बिनिवाले यांच्या समितीने केल्या होत्या. नीरीच्या या सूचना महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी वेकोलि किती वेगाने हे कामे पूर्ण करणार, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.