रायगड : रेल्वे अपघातातील जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रोहा येथे केली होती. यानुसार प्रशासनाच्या वतीने रेल्वे अपघातातील दोन जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला.
रेल्वे अपघातात जखमी झालेल्या वंचिता वसंत डोलकर, आरकेश वसंत डोलकर व सुशील अशोक चव्हाण यांना रोह्याच्या तहसीलदार उर्मिला पाटील व उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे यांनी प्रत्यक्ष जाऊन धनादेश सुपूर्द केला.