नागपूर : जैवविविधता संरक्षण व संवर्धनासाठी विशेषत: ग्रामीण भागामध्ये जागरुकता निर्माण होत आहे. जैवविविधता संवर्धन ही काळाची गरज असून या मंडळाला पशूसंवर्धन तसेच कृषी विभागाकडून आर्थिक मदत जाहीर करावी व बेटांवरील जैवविविधता संरक्षणाची मोहीम व्यापक करावी, असे आवाहन प्रधान सचिव (वने) प्रवीणसिंह परदेशी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळातर्फे 22 मे 2014 हा दिवस “आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस” म्हणून हॉटेल रॅडीसन ब्लु येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री. परदेशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. इराच भरुचा, प्रधान मुख्य वरसंरक्षक (वनबल प्रमुख) एस. डब्ल्यु.एच. नकवी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, विभागीय आयुक्त अनूपकुमार, सदस्य सचिव दिलीप सिंह, वनविकास महामंडळ नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक ए.के. निकम आदी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय जैवविविधता परिषदेकडून आज 22 मे रोजी “बेटावरील जैवविविधता” ही संकल्पना साकार केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 2011-2020 जैवविविधतेच्या आराखड्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा करण्यात आला.