সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, May 04, 2014

कोकण रेल्वेला अपघात

Grafics by Devnath Gandate
एंबेडेड छवि की स्थायी लिंक
सावंतवाडी पॅसंजर रेल्वेचे आज सकाळी इंजिनासह चार डब्बे रूळावरून घसरल्याने हा अपघात झाला या अपघातात 21 ठार तर २०० जखमी, अनेक प्रवासी जखमी झाल्याची भीती; कुर्ल्याहून अॅक्सीडेंट रिलीफ ट्रेन रवाना ; कोकण रेल्वे वाहतूक ठप्प.... आज सकाळी १० वा. च्या सुमारास झालेल्या या अपघातात २०० प्रवासी जखमी

मृतांची नावे :
भरत बळीराम सुर्वे (४९)
कृष्णा तुकाराम सुर्वे (७०)
सुरेखा जयराम नाकती (३५)
विक्रांत बाळकृष्ण सुर्वे
चिंटू गोसावी (२२)
प्रदीप पारवे
मिथिल जोशी
कमलेश चव्हाण
श्रद्धा कोकणे
 जखमी प्रवाशांची उपलब्ध नावे-
वैभव विश्राम जगीयार (३०, कांटे-संगमेश्वर), अंकिता अशोक महाडिक (२०, वडघर, माणगाव), प्रकाश महादेव पारांगे (५५, गणेशनगर, वडाळा), रिमा दिलीप राणे (३५, राजापूर), उल्हास शंकर कडवेकर (३८, संगमेश्वर), उत्कर्षा उल्हास कडवेकर (संगमेश्वर), रवींद्र सीताराम सावंत (५०, रावरदर), दीपक विश्वास जगीयार (३५, कांटे-संगमेश्वर), हेमंत पाण्डे, जयराम बाळाजी वकाते (४०), अनंत भगवान सावंत (६०, चिपळूण), सोहल हसन सुर्वे (३०, खेड), केतन भार्गव कुंभार (३५, माखजन, संगमेश्वर), अभय नामदेव वेंगुर्लेकर (३०, डोंबिवली), निखिल उल्हासकडवेकर (१५, संगमेश्वर), सायली उल्हास कडवेकर (१६, संगमेश्वर), प्रदीप शंकर सांगरे (१७, संगमेश्वर), रत्नागिर गोपाळ दळवी (१३, कणकवली), प्रेरणा प्रदीप सांगरे (२८), भागेश्री भालचंद्र वळे (पाली), भालचंद्र नारायण वळे (पाली), अनंत यशवंत तळेकर (५२), कविता भालचंद्र हुळे (६०, वैभववाडी), हर्षल दिलीप राणे (८), दीपक दत्ताराम कोळेकर (२५, गोवंडी), वैभव विष्णू गोसावी (१८, वणी), शांता भाडावकर (६०, खांदेश्वर), ९(पाली दत्ताराम पोळेकर) (५०, गोवंडी), रघुनाथ वाम शेळास (५०), दीपक केवळसी रॉय (५०, कल्याण) विनय नीलेश म्हात्रे (१८, नवेगाव), शालिनी शरद टाकळे, चंद्रकांत रामा मोकळ (५०, पांडापरू), दीपीका दत्ताराम पोळेकर (१३, गोवंडी)

मदतीची घोषणा

अपघातातील पिडीत व्यक्तींना रेल्वे मंत्र्यांकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये, तर गंभीर जखमी व्यक्तींना रुपये ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर किरकोळ जखमींना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, सावंतवाडी पॅसेंजर गाडीला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मदतीसाठी ०२३५२-२२८१७६/२२८९५४ आणि ०२२ – २७५६१७२१/३/४ असे दूरध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत.

इतर हेल्पलाईन क्रमांक

सीएसटी – ०२२ – २२७५५९९०

दादर – ०२२- २४११४८३६

पनवेल – २७४६८८३३

ठाणे – ०२२- ५३३४८४०

बेलापूर – ०२२-२७५६१७२१/२३/२४

या गाडय़ांना फटका

रद्द- मडगाव- दादर जनशताब्दी एक्स्प्रेस

अर्ध्यावर प्रवास संपलेल्या गाडय़ा-

१) मडगाव-सीएसटी मांडवी एक्स्प्रेस (थीवीपर्यंत)

२) सावंतवाडी-दिवा पॅसेंजर (रत्नागिरीपर्यंत)

३) रत्नागिरी- दादर (रोहय़ापर्यंत)

अन्य मार्गावरून वळवलेल्या गाडय़ा-

१) एर्नाकुलम- हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस

२) त्रिवेंद्रम- एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस

३) कोचुवेली-बिकानेर

४) कोईम्बतोर- बिकानेर वातानुकुलित एक्स्प्रेस (चारही गाडय़ा मडगाव-लोंढा-मिरजमार्गे)

दिवा- सावंतवाडी पॅसेंजरच्या रायगडमधील नागोठणेजवळील या अपघाताबरोबरच हस्सान- मंगळुरू मार्गावर रविवारच्या सकाळी मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वेच्या हद्दीत धावणारी कनवार- यसशवंतपूर एक्स्प्रेसही अन्य मार्गावरून वळवण्यात आली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.