भारतीय संसदेत विविध पदांसाठी भरती होणार आहे. लोकसभा सेक्रेटरीएटने काही रिक्त जांगासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यानुसार संसदेत इंटरप्रेटर ग्रेट – II, प्रिंटर आणि वेअरहाऊस मन या जागांची भरती होणार आहे.
इच्छूक उमेदवारांनी आधिक माहितीसाठी www.loksabha.nic.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. उमेदवारांनी आपले अर्ज ३०.०६.२०१४ पर्यंत कुरीयर किंवा पोस्टाने पाठवावे.
इंटरप्रेटर ग्रेट– II या पदासाठी उमेदवाराने इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. तांत्रिक शिक्षणाशी निगडीत असा कॉमप्युटर कोर्स केलेला असावा. प्रिंटर या पदासाठी प्रिंटींग टेक्नालॉजीचा अधिकृत कोर्स किंवा इंग्रजी व हिंदी या भाषेतून पदवीचे शिक्षण घेतलेले असावे. वेयरहाऊस मन या पदासाठी उमेदवार दहावी पास असावा किंवा प्रिंटीग टेक्नालॉजीचा ५ वर्षाचा कोर्स केलेला असावा.
या सर्व पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्ष इतकी आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी काही राखीव जागा असून त्यांना वयोमर्यादा सरकारी नियमांनुसार शिथिलशम आहे. या पदांसाठी एक टायपिंग टेस्ट तसेच लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. ही परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतरच योग्य उमेदवारांना भरती केले जाणार आहे.