चंद्रपूर @ कोळसा उत्खनन केल्या प्रकरणी पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या सह तीन कंपन्या आणि सात आयएएस अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
गुन्हा दाखल होणाऱ्यांमध्ये ७ आयएएस अधिकारी, २ तहसिलदार आणि तीन कंपन्यांचे ४० अधिकारी , २ डीसीएम, आणि १ जिल्हाधिकारी यांचाही समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्प्टा कंपनीने अवैधरित्या ६० हजार कोटींच्या कोळश्याचे उत्खनन केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाच्या न्यायाधिशांनी ६४ अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. कर्नाटक एम्टा, जीएमआर पॉवर वर्धा पॉवर आणि एचजीआयटीईएस या सर्वांच्या विरोधात कट कारस्थान करून सरकारची फसवणूक केल्याचा आणि खोटी कागदपत्रे बनवल्याचा आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.