सोळाव्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील खासदाराची माळ हंसराज आहिर यांच्या गळ्यात पडली आणि एनडीए सत्तेत आली. त्यामुळे चंद्रपूरच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता सट्टा बाजाराने अंदाज वतविणे सुरु केले आहे.
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाची रचना करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या आहे. यात भाजपाध्यक्ष राजनाथसिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नितीन गडकरी, मनोहर पर्रिकर, डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
राजनाथसिंह यांच्याकडे पंतप्रधानांनंतर दुसरे महत्त्वाचे खाते असलेल्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी भूपृष्ठ परिवहन, सुषमा स्वराज परराष्ट्र व्यवहार, अरुण जेटली यांच्याकडे अर्थमंत्रालय, मनोहर पर्रिकर गृहखात्याची, डॉ. मुरली मनोहर जोशी हे लोकसभेचे सभापती राहण्याची शक्यता आहे. एम. व्यंकय्या नायडू यांच्याकडे कृषी मंत्रालय आणि अनंत कुमार यांच्याकडे संसदीय व्यवहार मंत्रालय सोपविले जाऊ शकते. रविशंकर प्रसाद यांना विधि मंत्रालय, राजीव प्रताप रूडी नागरी उड्डाण मंत्रालय, शाहनवाज हुसेन यांच्याकडे अल्पसंख्यक विकास मंत्रालय आणि देशाचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्याकडे योजना आयोगाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संजय देवतळे, भाजपाचे हंसराज अहीर व आपचे अँड. वामनरावच चटप यांच्यात काट्याची लढत असल्याचा अंदाज मतदारांनी वर्तविला आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा व यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी असे एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश चंद्रपूर लोकसभा मतदार संघात आहे. यातील चार विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे तर दोन विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार आहेत.
विशेष म्हणजे, चारपैकी दोन आमदारांना राज्याच्या मंत्रीमंडळात कबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. पर्यावरण मंत्री संजय देवतळे स्वत: लोकसभेचे उमेदवार म्हणून आहेत. वरकरणी काँग्रेसचा उमेदवाराला परिस्थिती अनुकूल वाटत असली तरी आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांनी त्यांच्या विजयात अडथळा आणल्याचे मतदारात चर्चा आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा फायदा आपल्याला मिळेल, असा कयास भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघात ६३.२५ टक्के मतदान झाले. एकूण १७ लाख ५२ हजार ६१५ मतदारांपैकी ११लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला. यामध्ये राजुरा येथील २ लाख ८८ हजार ३३९ पैकी १लाख ९८ हजार ५८९ मतदान, चंद्रपुरात ३लाख ४७ हजार ५0५ पैकी एक लाख ९0 हजार ४१५, बल्लारपूर येथील ३ लाख ३७१ पैकी १लाख ८४ हजार१७0 मतदान, वरोरा येथे दोन लाख ७३ हजार १६७ मतदान, वणी येथे दोन लाख ६३हजार १0४ पैकी एक लाख ७६ हजार ७८0 मतदान तर आर्णी विधानसभा मतदार संघात दोन लाख ८0 हजार १२९ मतदारांपैकी एक लाख ७८ हजार १८४ मतदारांनी मतदान केले आहे. २00९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदार संख्या १५ लाख ३६ हजार ३५२ इतकी होती. यापैकी ८ लाख ९७ हजार ६0६ मतदारांनी त्यावेळी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ५७ इतकी होती. यंदाच्या निवडणुकीत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.
परिणामी वाढलेल्या टक्केवारीने सट्टा बाजार चांगलाच संभ्रमात सापडला आहे.
भाजपाचे खासदार हंसराज अहीर चौथ्यांदा लोकसभेत जातील काय? राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखविलेला विश्वास संजय देवतळे सार्थ ठरवतील काय? आणि मागील लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव यावर्षी निवडणुकीतून अँड. वामनराव चटप विजयात रुपांतर करतील काय? याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.
तीन उमेदवारांच्या काट्याच्या लढतीमुळे सट्टा बाजार संभ्रमात असल्याने सट्टा लागवडीचे प्रमाणही कमी असल्याचे सांगण्यात येते. सट्टा बाजारानुसार राज्यात आप ची एक जागा निघण्याची शक्यता आहे. त्यात चटप कि मेधा पाटकर हा संभ्रम आहे.