सोमवारी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यात कोळसा घोटाळा चव्हाट्य़ावर आणणारे भाजपचे खासदार हंसराज आहिर यांनाही संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र हंसराज अहिर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची हुलकावणी आली.
माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची ओळख झाली ती माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्यामुळे. आता हंसराज अहिर यांच्यामुळे चंद्रपूर चे नाव देशाच्या राजधानीत पोहोचणार अशी आशा होती. बालपणी दुधाचा व्यवसाय करायचे. वडील गंगाराम अहिर हे वैद्यकीय क्षेत्रात होते. त्यामुळे त्यांनी समाजसेवा हे व्रत अंगिकारले. खासदार हंसराज अहिर म्हणजे भाजपचा ओ बी सी चेहरा असून, देशात गाजलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कोळसा खाणी वितरण घोटाळ्याचा पर्दाफाश त्यानी केल्याने ते अचानक प्रकाशझोतात आलेत. काँग्रेसच्या तिकिटावर कुणालाही उभे केले तरी तो निवडून येणार ही काँग्रेसजनांची खात्री भाजपच्या हंसराज अहिर यांनी खोडून काढली. मात्र मंत्री पदी संधी न मिळाल्याने घोर निराशा झाली आहे