সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, May 21, 2014

२३व २४मे रोजी धान्य महोत्सव

विविध धान्य : १0८ शेतकर्‍यांनी केली नोंदणी

चंद्रपूर: उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेवर आधारित २३ व २४ मे रोजी चंद्रपूर येथे धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चांदा क्लब ग्राऊंड येथे होणारा हा महोत्सव कृषी व पणन, आत्मा, आर्थिक विकास महामंडळ व नाबार्ड संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. डी.एल. जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपविभागीय कृषी अधिकारी शिवचरण राजवाडे, नंदकुमार घोडमारे व संजय काचोळे यावेळी उपस्थित होते.
धान्य महोत्सवासोबतच धान्य महोत्सव व फळ महोत्सव असा तिहेरी योग या निमित्ताने चंद्रपूकरांना मिळणार आहे. या महोत्सवात १00 स्टॉल लावण्यात येणार असून आतापर्यंत १0८ शेतकर्‍यांनी स्टॉलसाठी नोंदणी केली आहे. शेतकर्‍यांना विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार असून सोबत एककिलो व पाच किलोची पॅकिंग बॅग कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी गट यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने व मध्यस्थ दलाल यांची साळखी कमी करण्याकरिता धान्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. धान्य महोत्सवासाठी जिल्ह्यातील शेतकरील, महिला बचत गट यांनी आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी तातडीने कृषी विभागाकडे नोंदणी करावी.कृषी व आत्मा विभागामार्फत विनामूल्य स्टॉल, टेबल व खुर्चीसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या धान्य महोत्सवाचे उद््घाटन पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील यांच्या प्रमुख उपस्थितीत २३मे रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. धान्य महोत्सवाचे आयोजन चांदा क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथे केलेले आहे.
शेतमालामध्ये विशेषत: गावराण गहु, तांदुळ, फळे, विविध दाळी व कडधान्य भाजीपाला व हळद इत्यादी शेतमाल शेतकरी व शेतकरी गटामार्फत विक्रीस उपलब्ध राहणार आहे. ग्राहकांसाठी २३ मे रोजी दुपारी ४ वाजेनंतर आणि २४ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत शेतमाल खरेदी करता येईल. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट व शेतकरी गट यांनी जास्तीत जास्त शेतमाल विक्रीसाठी घेऊन यावा अशी विनंती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.डी. एल. जाधव व प्रकल्प संचालक आत्मा डॉ. विद्या मानकर यांनी संयुक्तरित्या केली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.