সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, May 13, 2014

अचुक व निपक्षपणे मतमोजणी करा-जिल्हाधिकारी

चंद्रपूर दि.13-  16 तारखेला होणा-या चंद्रपूर लोकसभा निवडणूकीची मतमोजणी अचूक व निपक्षपातीपणे करा अशा सूचना देतानाच मतमोजणीमध्ये हलगर्जीपणा अजिबात होवू देवू नका असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी मतमोजणी अधिका-यांना दिले.  प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात आयोजित मतमोजणी अधिका-याच्या प्रशिक्षणात ते बोलत होते.
     निवडणूक निरीक्षक एस.के.दास, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दामोधर नान्हे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते, उपजिल्हाधिकारी पंकज चौबळ व सर्व सहाय्यक निवडणूक अधिकारी यावेळी उपस्थित होते. मतमोजणी कशी करावी याचे प्रात्याक्षिक उपविभागीय अधिकारी संजय दैने यांनी उपस्थितांना करुन दाखविले.
    मतमोजणीच्या एक तास अगोदर उमेदवारांच्या प्रतिनिधी समोर स्टाँग रुम उघडण्यात येईल. सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार असून प्रथम टपाल मतांची मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेच प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार आहे.  मतमोजणीच्या साधारणता 22 ते 25 फे-या होतील.
    मतमोजणीसाठी विविध उमेदवारांचे 4 ते 5 हजार प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात उपस्थित राहणार असून त्यांची खात्री होईल अशा पध्दतीने मतमोजणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. आकडयाचे उच्चार स्पष्ट असावे तसेच प्रतिनिधीचे समाधान होईल अशा पध्दतीने काम करावे असेही त्यांनी सांगितले.
    मतमोजणीच्या दिवशी सकाळी 5 वाजता कर्मचारी सरमिसळ करण्यात येणार आहे. यानंतर कुठल्या कर्मचा-यांची कुठल्या विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीसाठी नियुक्ती झाली हे कळणार आहे. सर्व अधिकारी कर्मचा-यांची राहण्याची व्यवस्था बुरडकर सभागृह व तलाठी प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी करण्यात आली आहे.  त्यांच्या जेवनाची व वाहनाची सुध्दा व्यवस्था करण्यात आल्याचे दामोधर नान्हे यांनी सांगितले.
    मतमोजणी केंद्रात अधिकारी  कर्मचारी यांना मोबाईल फोन वापरण्यास आयोगाने मनाई केली असून उमेदवाराचे प्रतिनिधी यांनाही मोबाईल नेण्यास प्रतिबंध असणार आहे.  मिडिया प्रतिनिधीसाठी स्वतंत्र मिडीया कक्ष उभारण्यात आला आहे.  मतमोजणीची आकडेवारी मॅन्युअल व संगणकीय पध्दतीने नोंदविण्यात येणार असून नागरिकांच्या सुविधेसाठी प्रियदर्शनी सभागृह व पोलीस कवायत मैदान या ठिकाणी डिस्प्लेबोर्ड व ध्वनीक्षेपणाची सुविधा असणार आहे.  मतमोजणीच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी         डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.