সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 05, 2017

भाजपने जनतेचा विश्वासघात केला

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे*

वर्धा/प्रतिनिधी - विश्वासाने जनतेने भाजपला निवडून  दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच शिवाय शेतकरी राजाही उध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सेलसुरा जिल्हा वर्धा येथील सभेत केला.
विदर्भामध्ये पदयात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहेत. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही. सगळयाच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही.सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सुरेखा ठाकरे आदींसह स्थानिक ग्रामस्थ,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. आज एकूण 14 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी यात्रा वर्धा येथे जाणार आहे.

#हल्लाबोल मोर्चाच्या आजच्या पाचव्या दिवसाची सुरुवात देवली येथून झाली. एका जिनिंग मध्ये जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. सरकारची कापूस खरेदी केंद्र आणखी सुरू झाली नसल्याने बेभावाने व्यापा-यांना कापूस विकावा लागत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.