आमदार नानाजी शामकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चंद्रपूर /प्रतिनिधी:
वेकोलितील जास्त उत्पन्न घेण्याच्या
हव्यासापोटी आठवड्याभरात
माजरी क्षेत्रातील तेलवासा व कुनाडा खाणीत अपघातात एकाच्या मृत्यू तर सहा कामगार जखमी झाले. ही घटना खाणीतील सुरक्षा व्यवस्थेच्या अक्षम्य दुर्लश् झाल्यामुळे सदर प्रकरणात माजरी वेकोलि क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधकावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करा अशी मागणी आमदार नानाजी शामकुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
माजरी क्षेत्रातील तेलवासा येथे २४ नोव्हे. २०१७ ला कोळसा भिंत कोसळून श्री. नरसू झा वय ५७ वषीय कामगाराचा मृत्यू झाला. त्याच आठवड्यात कुनाडा खाणीत सहा कामगार गंभीर जखमी झाले. दोन्ही खाणीत अपुरी सुरक्षा व्यवस्थेच्या अभाव, कामावर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कामगाराचे कल्याण आदी बाबीकडे मांजरी क्षेत्रातील मुख्य महाप्रबंधकाचे कुठेही लक्ष नसून खाणीत अपघात होणे नित्याचीच बाब झाल्याचे निदर्शनास आले आहे. याकरिता मृतांचा वारसांना आश्रित म्हणून तात्काळ नोकरी द्यावी आणि झालेल्या नुकसान भरपाईचा खर्च वेकोनी व्यवस्थापकाने तात्काळ द्यावा तसेच एकाच आठवड्यात माजरी क्षेत्रातील तेलवासा व कुनाडा कोळसा खाणीत घडलेला प्रकार अतिशय निदनीय आहे.
येथील व्यवस्थापक हे निष्क्रिय असून संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आमदार नानाजी शामकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राच्या माध्यमातून केली आहे. हा प्रश्न अधिवेशनात सुद्धा लावून धरणार असून संबंधित कामगारांना न्याय मीळण्याच्या दृष्टीने मागणी करणार असल्याचे आमदार नानाजी शामकुळे यांनी प्रसिद्धी पत्राच्या माध्यमातून कळविले आहे.