সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 12, 2017

अश्लील वर्तनाचा आरोप, शिक्षकाची आत्महत्या


नागपूर : विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन करण्याचा आरोप करून भर शिकवणी वर्गात काही जणांनी बेदम मारहाण केल्यामुळे अपमानित झालेल्या एका शिक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

संदीप वीरेंद्रनाथ विश्वास (वय ४२) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. जरीपटक्यातील सुवर्णनगर, गुरू नानक फार्मसीसमोर त्यांचे निवासस्थान आहे. ते पाचपावलीतील आवळेबाबू चौकात खासगी शिकवणी वर्ग चालवीत होते. सोमवारी दुपारी वर्ग सुरू असताना वर्गातील एका विद्यार्थिनीच्या मित्रासह तीन ते चार जण आले. त्यांनी वर्गात बसलेल्या विद्यार्थिनीसोबत तू अश्लील वर्तन करतो, असा आरोप करीत संदीप यांना बेदम मारहाण केली. वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार झाल्यामुळे मोठी गर्दी जमली. विद्यार्थी आणि चौकातील अनेकांसमक्ष मारहाण आणि घाणेरडा आरोप झाल्यामुळे संदीप व्यथित झाले. त्यांनी पाचपावली पोलीस ठाणे गाठले. तेथे सायंकाळी त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला. ते माहीत पडताच मारहाण करणारे आणि मुलीकडील अन्य काही जण पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्हीकडून रात्री १० वाजेपर्यंत आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दरम्यान, अपमान झाल्याच्या भावनेमुळे रात्रभर अस्वस्थ राहिलेल्या संदीप यांनी त्यांच्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी ११.१५ वाजता ते उघड झाल्यानंतर त्यांच्या वृद्ध आईने एकच आक्रोश सुरू केला. तो ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी जरीपटका पोलिसांना कळविले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.