चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर
महाऔष्णिक विद्युत केंद्रात एलिकॉन कंपनीत कार्यरत असलेल्या एका ४४ वर्षीय
कामगाराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चंद्रशेखर
तोंगटीवार(४४) रा.चंद्रपूर असे मृतकाचे नाव असून ५०० मेगावॅट क्षमतेच्या
आठ क्रमांकाच्या संचात सीएचपी वॅगन टिपलरचे काम एलिकॉन कंपनीला देण्यात
आले आहे . चंद्रशेखर तोंगटीवार हा या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता.
दरम्यान रेल्वे वॅगन रिकामी करून बाहेर निघत असताना तो रेल्वेखाली आला. त्याला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता
डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान जो पर्यंत मृतकाच्या
नातेवाईकांना मदत मिळत नाही. आणि दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह
उचलणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी घेतला
त्यामुळे काही काळ घटनास्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर एलिकॉन
कंपनीने १ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईका प्रेत उचलण्यास तयार झाले .