नागपूर/प्रतिनिधी
खासगी कंपनी अंतर्गत काम करणाऱ्या कामगाराचा अपघाती मृत्यु झाला . पाईप स्थानांतरीत करताना हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे . ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावली शिवारात शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली . प्रणय अजाबराव कोरडे ( ४२. रा. रोहना , ता सावनेर ) असे मृत कामगाराचे नाव आहे . प्रणय कोरडे हे खापरखेडा - नांदगाव यसंबा अभि इंजिनिअरिंग कंपनीमार्फत पाईपलाईन टाकण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या कामावर मृतक कामगार प्रणय कोरडे कार्यरत होते . ही पाईपलाईन जमिनीपासुन ३ फुट उंचावर आहे आहे . प्रणय कोरडे यांच्या डोक्यावर पडलेला पाईप साहोली येथील घटनास्थळी दिसुन आला नाही . जखमी प्रणय कोरडे यास इतर कामगारांनी खापरखेडा येथील पवार हॉस्पिटलमध्ये नेले, येथुन त्यास तात्काळ पुढील उपचारार्थ नागपुर मेयो हॉस्पिटल येथे नेले असता डॉक्टरांनी प्रणय कोरडे यांना मृत घोषित केले . लोखंडी पाईप उचलण्यासाठी हॅड्रा मशिनचा वापर केला जातो . या मशिनद्वारे पाईप नेत असताना प्रणय कोरडेच्या डोक्यावर कदाचीत पाइप पडुन प्रणयचा मृत्यु झाला असावा असे कामगारांनी पोलीसांना दिलेल्या लेखी बयानात सांगितले मात्र मृतक कामगार प्रणय कोरडे यांचे कुटुबिंयांनी घटनेवर संशय व्यक्त केला असुन मृतकाचा मुलगा अवंतीक प्रणय कोरडे यांने पोलीसात तक्रार दाखल केली . कामगार प्रणय कोरडे यांच्यावर पत्नी व दोन मुलांची जबाबदारी होती पोलीसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पारशीवनी पोलिस करीत आहे .
Sunday, December 03, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য