चंद्रपूर/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षापासून रेंगाळत असलेल्या आणि राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केलेल्या विदर्भ राज्याच्या लढ्यात सक्रीय उडी घेण्याचा निर्णय इको- प्रोच्या कार्यकारिणीने घेतला आहे. त्यानुसार विविध संघटनांनी पुकारलेल्या 11 डिसेंबरच्या विदर्भ बंद मध्ये संस्था सहभागी होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर येथिल हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समीती व सर्व विदर्भवादी संघटनानी ‘विदर्भ बंद’ ची हाक दिलेली आहे. या ‘विदर्भ बंद’ ला चंद्रपूर जिल्हयातील इको-प्रो संस्थेचा पुर्ण पाठींबा आहे.
स्वंतत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भातील समस्या सुटणार नाही. विदर्भाचा विकास करायचा असेल तर स्वंतत्र विदर्भ राज्य हेच एकमेव पर्याय असून, या बंद मध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे. तसेच सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, शाळा, महाविदयालय, तसेच खाजगी वाहतूक व्यावसायीक, युवक-युवती, विदयार्थी आदीनी शातंतामय रितीने कडकडीत बंद पाळावे. या बंद दरम्यान कोणीही सार्वजनीक शांतता भंग करणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्था राखल्या जाईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केले आहे.
Sunday, December 10, 2017
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
अमोल कोंडबतुनवार यांचे निधन सच्चा कार्यकर्ता हरपला- सुधीर मुनगंटीवार. चंद्रपूर/प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी
जुनोना- जलमहलची झाली वाताहत जुनोना- जलमहलचे व्हावे सौंदयीकरण पुरातत्वीय दृष्टया संवर्धन करून पर्यटन विकास करण्याची इको-प्रोची
शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर न केल्यास हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही - शरद पवार चंद्रपूर -राज्य सरकारने फसवी कर्जमाफी केली असून रोज नवनवीन सूचना ते करत आहेत. राज्यातील सर्वस
किल्ला स्वच्छता अभियान पाहण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना निमंत्रण चंद्रपूर/प्रतिनिधी: राज्यातील गड-किल्ले स्वच्छता संदर्भात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन लव
सहाय्यक अभियंत्याने घेतली मुख्यालयावरून उडी वरोरा-भद्रावती/(प्रतिनिधी) वेकोली वणी क्षेत्रातील भद्रावती तालुक्यायील ताडाळी( उर्जाग्राम) येथील
जागतीक व्याघ्र दिनी इको-प्रो ची जुनोना गावांत जनजागृती इको-प्रो, संयुक्त वनव्यवस्थापन समीती चा उपक्रम चंद्रपूर/प्रतिनिधी: आज जागतीक व्याघ
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য