সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 05, 2017

५ डिसेंबर दिनविशेष

  • नेल्सन मंडेला - (जुलै १८, १९१८ - डिसेंबर ५, २०१३) हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेते होते.

  •     आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
  • ठळक घटना/घडामोडी
  •     १४८४ : पोप इनोसंट आठव्याने समिस देसिदरांतेस हा पोपचा फतवा (papal bull) काढला व त्याद्वारे हाइन्रिक क्रेमर व जेकब स्प्रेन्गर यांची सत्यशोधकपदी नेमणूक केली. त्यांची प्रमुख कामगिरी होती जर्मनी मधील तथाकथित चेटूक व जादूटोणा शोधून त्याचा नायनाट करणे. हे 'सत्यशोधन' म्हणजे जर्मनीच्या ईतिहासातील अतिकठोर प्रकरणांपैकी एक होय.
  •     १४९२ : क्रिस्टोफर कोलंबसने हिस्पॅनियोला बेटावर पाय ठेवला व नव्या जगात पाउल ठेवणारा पहिला युरोपियन ठरला.
  •     १५६० : फ्रांसचा राजा फ्रांसिस दुसरा याचा मृत्यू. चार्ल्स नववा राजेपदी.
  •     १५९० : निक्कोलो स्फोन्द्राती ग्रेगोरी चौदावा म्हणून पोपपदी.
  •     १९३२ : जर्मनीत जन्मलेल्या व स्वित्झर्लंडचे नागरिकत्व असलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
  •     १९४५ : फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.
  •     १९८९ : फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.
  • जन्म/वाढदिवस
  •     १३७७ : ज्यान्वेन, चीनी सम्राट.
  •     १४४३ : पोप ज्युलियस दुसरा.
  • मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन
  •     ७४९ : दमास्कसचा संत जॉन.
  •     १५६० : फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.
  •     १७९१ : वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.
  •     १९२६ : क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.
  •     २०१३ : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.