परिवहन मंत्री दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम मंत्री
एकनाथराव शिंदे व महसूल मंत्री संजय राठोड यांची उपस्थिती
जय हिंद क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळ द्वारा स्व. सुनील नारायण धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार बाळूभाऊ धानोरकर चषक विदर्भ स्तरीय पुरुष व महिला कबड्डी सामन्यांचे आयोजन दि १४,१५,१६ व १७ डिसेंबर ला स्व. उत्तम मेश्राम स्टेडीयम, कॉटन मार्केट वरोरा येथे आयोजन केले आहे.
आज दि. १४ ला सायं. ६ वाजता कबड्डी सामन्यांचे उदघाटन समारंभ पार पडणार असून या कार्यक्रमाचे उदघाटन परिवहन मंत्री दिवाकर रावते, अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, विधानपरिषद सदस्य तानाजी सावंत , आमदार प्रताप सरनाईक, आमदार शुभाष भोईर, आमदार अजय चौधरी, आमदार कुडाळकर, आमदार हेमंत पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुनील शिंदे, आमदार रमेश लटके, आमदार डॉ राहुल पाटील, आमदार तृप्ती सावंत, माजी आमदार विश्वासराव नांदेकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवर, संजय देरकर, आभास शिंग प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या कबड्डी स्पर्धेत विदर्भातून विविध जिल्यातून थरारक स्पर्धक स्पर्धेस सहभागी होत आहे. या स्पर्धेचा वरोरा भद्रावती वासीयांनी अवश्य लाभ घ्यावा असे आयोजक भद्रावती- वरोरा निर्वाचन क्षेत्राचे आमदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले आहे.