चिमूर नगर परिषदच्या कचरा कन्टेरकडे दुर्लक्ष
चिमूर/प्रतिनिधी:

चिमूर नगर परिषद ने मागील दोन वर्षा पूर्वी कचरा कंटेनर खरेदी केले असून फुटबाल ग्राऊंड वर ठेवलेले आहे कंटेनर जन्ग खात पडले असून त्या कडे नप चे लक्ष नाही केवळ चिरीमिरीसाठी कंटेनर खरेदी केले परंतु त्या कंटेनर चा वापर ज्या कामासाठी होता त्या साठी अजून पर्यत वापर करण्यात आला नाही फुटबाल ग्राउंड वर कंटेनर पडलेले असून त्या कडे दुर्लक्ष केले जात आहे नप ने कंटेनर चा वापर करीत नसेल तर ते भंगार मधून लिलाव करावे जेणेकरून आलेली आय हि नप च्या सार्वजनिक हितासाठी उपयोगी पडेल नप ची कचरा कंटेनर भंगार मध्ये लिलाव करण्याची मागणी तालुका युवक कांग्रेस तालुका सरचिटणीस राजू शर्मा यांनी केली आहे